शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ट्रामा टीमचे प्रशिक्षण उत्साहात

By admin | Updated: December 31, 2016 01:42 IST

बालकांवरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला व बलात्कारपिडीत महिलांना तातडीने आधार देण्यासाठी व या

गोंदिया : बालकांवरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला व बलात्कारपिडीत महिलांना तातडीने आधार देण्यासाठी व या मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या मनोधैर्य योजनेच्या जिल्हा ट्रामा टीमचे प्रशिक्षण २८ डिसेंबर रोजी कटंगीकला येथील लॉनमध्ये उत्साहात संपन्न झाले. प्रशिक्षणाचे उद्घाटन न्या.ए.एच. लध्दड यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, तज्ञ मार्गदर्शक म्हणून सविता बेदरकर, अनिल रेवतकर, वैशाली केळकर, प्रा. संगीता घोष यांची उपसिञथती होती. श्रीमती वेदरकर यांनी मनोधैर्य योजना संबंधित यंत्रणेच्या प्राथमिक स्तरावर आवश्यकता व महत्व प्रा.घोष यांनी मनोधैर्य योजनेत प्रत्यक्ष काम करताना प्रकरण संवेदनशीलतपणे हाताळण्यात यावे याकरिता प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपून करणे याविषयी रेवतकर यांनी या योजनेची पार्श्वभुमी, अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणेचा सहभाग, श्रीमती केळकर यांनी कायदेविषयक सहाय्य व एफ.आय.आर. लिहिताना घ्यवयाची काळजी, रजनी रामटेके यांनी ट्रामा टिम तयार करणमागचा उद्देश, हेतू, कर्तव्यदक्ष व जबाबदाऱ्या, सुहास बोंदरे यांनी लैगीग शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मधील तरतूदी व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, अधिपरिचारिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नम्रता चौधरी यांनी केले. संचालन परीरिक्षा अधिकारी के.बी. रामटेके यांनी केले. उपस्थितांचे आभार परिविक्षा अधिकारी राजू बोदले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)