शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:58 IST

प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधन मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा प्रभाव । बदलत्या जीवनशैलीमुळे गरजाही बदलल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधन मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. पूर्वीच्या बलुतेदार पद्धतीवर अवकळा आल्याने कारागिरांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.पूर्वीच्या काळी सुतार, लोहार, कुंभार यांना शेतकऱ्यांच्या जीवनात विशेष स्थान होते. सुतार हा शेतीसाठी लागणारे वखर, नांगर, दरवाजे बनवून द्यायचे. आता हे साहित्य लोखंडी स्वरूपात मजबूत प्रकारात बाजारात मिळत असल्याने त्याचा परिणाम लोहार कारागिरांच्या व्यवसायावर होत आहे. पारंपरिक पद्धतीने कातड्यावर प्रक्रि या करु न पादत्राणे तयार केले जायचे. पद्धतीनुसार चपला, जोडे बाजारात उपलब्ध झाल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुंभार मातीला एकजीव करून माठ, सुरई, पणत्या, रांजण तयार करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. आता या व्यवसायाला देखील उतरती कळा लागली असून या व्यवसायिकांना आता शासकीय मदतीची गरज आहे.बाजारपेठेत आधुनिक तंत्राचा व यांत्रिक पद्धतीने बनविलेल्या साधनांनी शिरकाव केल्याने या पारंपरिक व्यवसायिकांनी बनविलेल्या साहित्याला आता विशेष मागणी नाही. जागतिकीकरणात ग्रामीण भागातही या वस्तू सहजरित्या उपलब्ध होत असल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात तर कुंभाराचे चाक बंद होण्याच्या मार्गावर आहे. तप्त आगीत लोखंडाला आकार देऊन ग्रामस्थांना पावशी, कुºहाड, विळा तयार करणाºया लोहार समाजावर आधुनिकतेमुळे व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. या व्यावसायिकांना आता कामाच्या शोधात शहरात भटकंती करावी लागत आहे. त्यांना प्रशिक्षणातून तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्यास व्यवसायाला संजीवनी मिळेल.उदरिनर्वाहाचे साधन हरवलेग्रामीण भागात वडिलोपार्जीत व्यवसाय करणाºया कारागिरांवर कालौघात उपासमारीची वेळ आली आहे.या कारागिरांमधील कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने प्रभावीपणे उपाय योजना राबविण्याची मागणी होत आहे.व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी आवश्यक प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करु न देण्याची गरज व्यक्त होत आहे. नामशेष होणाºया या कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन देत व्यवसायाला उभारी देण्याची मागणी आहे.