शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी व अधिकारी आणतात बाधा

By admin | Updated: March 28, 2017 00:55 IST

शासनाकडे आम्ही आपली बाजू मांडली आहे. परंतु काही विशिष्ट व्यापारी व अधिकारी शासनाला चुकीची माहिती पुरवून ...

तेंदूपत्ता विक्री प्रकरण : ग्रुप आॅफ ग्रामसभेचा आरोपगोंदिया : शासनाकडे आम्ही आपली बाजू मांडली आहे. परंतु काही विशिष्ट व्यापारी व अधिकारी शासनाला चुकीची माहिती पुरवून आम्ही राबवित असलेल्या उपक्रमात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच त्यांनी आमचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप तेंदूपत्ता विक्रीच्या सामूहिक वनहक्क प्राप्त गावांच्या वनहक्क धारकांच्या ग्रुप आॅफ ग्रामसभेने केला आहे.ग्रुप आॅफ ग्रामसभेने दिलेल्या पत्रकानुसार, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, अमरावती व गोंदिया जिल्ह्यातील १०० गावांतील वनहक्क कायदा २००६ व त्या अंतर्गत नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ च्या अधिन राहून कलम ३ (१) (ग) नुसार ग्रुप आॅफ ग्रामसभेला गौण उपज गोळा करणे, विक्री व व्यवस्थापन करण्याचे स्वामित्व मिळाले आहे. सुधारित नियम २०१२ च्या नियम २ (१) (घ) अन्वये ग्रामसभांचा महासंघ स्थापन करून विक्री करण्याचे अधिकारी असून त्यानुसार सन २०१३ पासून तेंदूपानाची विक्री करीत आहेत.तेव्हापासून जिल्ह्यातील तीन गावे व इतर जिल्ह्यातील गावे अशा १६ गावांची रीतसर निविदा काढणे, जाहिरात देणे आदी कार्यवाही करण्यात आली. परंतु व्यापाऱ्यांनी माल न घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा उपवनसंरक्षकांनी आपल्या दालनात व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ग्रामसभेच्या मालावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला होता. सन २०१४ मध्ये निविदा व जाहिरात देऊनही त्यांच्या मालावर बहिष्कार घातल्याने आदिवासी विभाग महामंडळाकडून सन २०१३ पासून निधी प्राप्त करून व्यवहार ग्रामसभांनी केला. सन २०१६ मध्ये काही व्यापाऱ्यांना ई-मेलने निविदा पाठविली. परंतु फक्त एकाच व्यापाऱ्याने निविदा भरली. मात्र पूर्वीच्या तिन्ही वर्षात पारदर्शकता ठेवूनही ग्रामसभेचा माल व्यापाऱ्यांनी घेतला नाही. सन २०१७ मधील विक्री आपल्या अधिकारात केल्याचे गृप आॅफ ग्रामसभेचे म्हणणे आहे. त्यात इतरांना कोणताही अधिकार नाही. मात्र ही बाब व्यापारी व लोकप्रतिनिधींच्या पचनी पडत नाही. वन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची व खोटी माहिती पुरवून ती शासनास पाठविली आहे. यात वन विभागाचे सेवानिवृत्त वनाधिकारी ढवळाढवळ करून सन २०१३-२०१४ व २०१६ मध्ये बहिष्कार करणाऱ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोप ग्रुप आॅफ ग्रामसभेने केला आहे. (प्रतिनिधी)