शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांच्या १७ पदांसाठी तब्बल २ हजार २७७ स्पर्धक

By admin | Updated: September 16, 2015 02:24 IST

जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्या वतीने सरळ सेवा भरती अंतर्गत तलाठी पदाच्या १७ जागांकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

गोंदिया : जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्या वतीने सरळ सेवा भरती अंतर्गत तलाठी पदाच्या १७ जागांकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांपैकी २ हजार ९२२ उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. दरम्यान, रविवार (दि.१३) रोजी शहरातील ११ केंद्रांवरून दोन हजार २७७ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ६४५ उमेदवार गैरहजर होते.विशेष म्हणजे शनिवारी १२ सप्टेंबर रोजी पोळा सण होता. तसेच ऐन परीक्षेच्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी मारबदीचा सण साजरा केला जातो. असे असतानाही विविध परीक्षा केंद्रांवरून तब्बल २ हजार २७७ स्पर्धकांनी परीक्षा दिली. तसेच त्वरित दुसऱ्या दिवशी प्रश्नपत्रिकांची उत्तरतालिकासुद्धा इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळू शकतात याची पडताळणी करणे उमेदवारांना शक्य झाले आहे.जिल्ह्यातील तलाठी पदाच्या १७ जागांकरिता २५ आॅगस्ट रोजी जाहिरात प्रकाशित करून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेसाठी २ हजार ९२२ परीक्षार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले होते. तसेच अर्जांमध्ये त्रुटी असलेल्या १०८ उमेदवारांना अर्जातील त्रुट्या दूर करण्यासाठी वेळही देण्यात आले होते. यानंतर परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची रविवारी १३ सप्टेंबर रोजी शहरातील एकूण ११ परीक्षा केंद्रांत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान परीक्षा घेण्यात आली.यात आदर्श सिंधी विद्यालय, एस.एस. गर्ल्स कॉलेज, नमाद महाविद्यालय, मनोहर म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालय, मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी शाळा, गुजराती नॅशनल शाळा, राजस्थान कन्या विद्यालय, जे.एम. हायस्कूल, सरस्वती महिला विद्यालय, डी.बी. सायंस कॉलेज व रविंद्रनाथ टागोर हायस्कूलचा समावेश आहे. सर्वच परीक्षा केंद्रांवर शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. प्रत्येक केंद्रात केंद्रप्रमुख व उपकेंद्रप्रमुखांची उपस्थिती होती. सदर परीक्षा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्यात आली असून चित्रीकरणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. (प्रतिनिधी)विविध आरक्षणानुसार तलाठी पदांची संख्याअनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा असून यापैकी दोन समांतर आरक्षण व्यतिरिक्त (महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्प व भूकंपग्रस्त, खेळाडू व अपंग वगळून) आहेत. वि.जा.अ.साठी एकूण दोन जागा असून समांतर आरक्षण व्यतिरिक्त एक आहे. भ.ज. (क) साठी एकूण दोन जागा असून त्या दोन्ही समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहेत. भ.ज. (ड) साठी एकूण एक जागा असून तीसुद्धा समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहे. ओबीसींसाठी एकूण चार जागा असून केवळ एक जागा समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहे. तर खुल्या गटासाठी एकूण चार जागा असून सर्वच समांतर आरक्षणाच्या असून यात समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एकही जागा नाही.