शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या दुचाकीवर वाघाने घातली झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात (दि. १) सायंकाळी ७ च्या सुमारास प्रवास करीत असलेल्या दुचाकीस्वार दोघांवर ...

गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात (दि. १) सायंकाळी ७ च्या सुमारास प्रवास करीत असलेल्या दुचाकीस्वार दोघांवर अचानक वाघाने झडप घातली. दरम्यान, दुचाकीस्वार दोघेजण वाघाच्या हल्ल्यामुळे गाडीवरुन खाली पडले, तर दुसरीकडे वाहनाच्या प्रकाशामुळे वाघाने रस्त्याकडेला दडी मारली. हा थरार मार्गाने जात असलेल्या चारचाकी वाहनचालकांनी प्रत्यक्ष अनुभवला. दरम्यान, एका चारचाकीचालकाने आपले वाहन थांबवून दुचाकीस्वारांना सहारा दिल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले.

रंजित परशुरामकर (वय ३५), दानेश गहाणे (४०, दोन्ही रा. खाडीपार) अशी दुचाकीस्वारांची नावे आहेत. खाडीपार येथील रंजित परशुरामकर व दानेश गहाणे हे दोघे दुचाकीने गोरेगावकडून डव्वाकडे जात होते. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मुंडीपार ते मुरदोली या दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या जंगल शिवारात अचानक रस्त्याच्या एका बाजूने वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला चढविला. वाघाच्या हल्यात दोघे दुचाकीस्वार खाली पडले, तर दुसरीकडे रस्त्याने जात असलेल्या चारचाकी वाहनाच्या प्रकाशामुळे वाघाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दडी मारली. हा सर्व प्रकार दुचाकीस्वारांच्या मागे चारचाकी वाहनाने जात असलेले माजी जि. प. सदस्य राजू चांदेवार व त्यांच्या चालकाने प्रत्यक्ष अनुभवला. दरम्यान, दोन्ही युवकांना वाचविण्याच्या अनुषंगाने जिवाची कसलीही पर्वा न करता चांदेवार यांनी दुचाकीस्वारांना उचलले. त्यातच त्यांची विचारपूस करीत असतानाच तो वाघ इतरत्र नसून, रस्त्याच्या बाजूलाच असल्याचे सांगितले. दोन्ही दुचाकीस्वारांना चारचाकी वाहनात घेऊन घटनास्थळावरून ते रवाना झाले. काही अंतरावर असलेल्या मुरदोली गावशिवारात जाऊन दोन्ही दुचाकीस्वारांची विचारपूस केली असता, ते दोन्ही किरकोळ जखमी असल्याचे समोर आले. राजू चांदेवार यांच्यामुळे त्या दोघांचे प्राण वाचले.