शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्ट्यांवर धाडसत्र

By admin | Updated: May 30, 2016 01:35 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत दोन दिवसात

एक्साईजची कारवाई : २.१० लाखांचा मुद्देमाल जप्तगोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत दोन दिवसात अवैध हातभट्ट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारू विक्री करणाऱ्यांवर धाडसत्र राबवून ३१ गुन्हे दाखल केले. यात १९ आरोपींना मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.अवैध हातभट्टी व मोहा दारू गाळणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात दोन दिवस हे धाडसत्र राबविण्यात आले. यात २९४ लिटर हातभट्टीची दारू, ९०८० लिटर मोहा सडवा, १७ लिटर देशी दारू तसेच हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा २.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत नुतन दशरथ वाघमारे, रा.तेढा, ता.गोरेगाव, अशोक धुर्वे रा.गोंडीटोला ता.गोंदिया, कमलेश पडोळे रा.छोटा गोंदिया, संजय जांभुळकर रा.तिरोडा, आशिष टेंभेकर रा.सोनेगाव, ता.गोंदिया, मधुकर सांगोडे रा.सोनेगाव, ता.गोंदिया, बेनिराम धुवाधवारे रा.लेंडेझरी, परमेश्वर कांबळे रा.तुमखेडा, ता.गोंदिया, रतीराम उईके रा.जामुटोला ता.देवरी, निलेश नेमपाडे रा.करटी, ता.तिरोडा, प्रशांत मेश्राम रा.करटी, प्रतिमा भालाधरे रा.भुराटोला ता.तिरोडा, राजू सुकराम झाडे रा.वडेगाव नाला, ता.तिरोडा, प्रल्हाद उरकुडा पटले रा.वडेगाव नाला, प्रतिमा उके रा.बोरगाव, अर्जुन धमगाये रा.कोडेलोहारा, ता.तिरोडा, सुमेर वासनिक रा.कोडेलोहारा रा.तिरोडा, मदनलाल सेवाराम लिल्हारे रा.नागरा, ता.तिरोडा, उर्षा पुरण वाघाडे रा.कामठाटोली ता.गोंदिया या १९ आरोपींना अटक झाली.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक बी.जी.भगत, भरारी पथकाचे प्र.निरीक्षक बी.डी.पटले, दुय्यम निरीक्षक आर.के.निकुंभ, दु.निरीक्षक देवरी एम.पी.चिटमटवार, दु.निरीक्षक देवरी एस.एल. बोडेवार, सहा.दु. निरीक्षक कोवे व रहांगडाले, जवान ढाले, पागोटे, उईके, ढोमणे, मुनेश्वर, हरिणखेडे, सिंधपुरे, दुबे व जवान वाहनचालक सोनबर्से व मडावी यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)परमीटधारक ग्राहकांनाच मद्यविक्री कराजिल्हाभर सर्व दारू दुकानांमधून परमीटधारक ग्राहकांनाच मद्याची विक्री होते किंवा नाही याची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मे महिन्यात अशा ३ दुकानांवर कारवाई करण्यात आली. मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनीही मद्यसेवन परमीट बाळगूनच मद्याची खरेदी करावी. याकरिता विभागाकडून हजार रुपयात आजीवन परमीट व १०० रुपयात एक वर्षाकरिता परमीट उपलब्ध करून देण्यात येते. हे परमीट नसणाऱ्या ग्राहकांनी दारू दुकानातून एका दिवसाकरिता दोन रुपयाला देशी मद्यसेवन परमीट तर पाच रुपयात विदेशी मद्यसेवन परमीट घेऊनच मद्याची खरेदी करावी, असे आवाहन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.