शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचे तीनतेरा

By admin | Updated: August 25, 2015 02:21 IST

शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र अंमलबजावणी

साखरीटोला : शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र अंमलबजावणी करणारी यंत्रणा शासनाच्या योजनांचा कसा बट्याबोळ करते, आरोग्य विभागच जनतेच्या व रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ करते, स्वच्छतेचे धडे देणारे डॉक्टर स्वच्छतेविषयी किती बेफिकीर असतात, याचे जिवंत चित्र जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटीदरम्यान उघड्या डोळ्यांनी अनुभवले.दि. २३ आॅगस्टला सकाळी १०.४५ वाजता समाजकल्याण सभापती वडगाये यांनी सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रात पसरलेली घाण, रुग्णांची अव्यवस्था पाहून आश्चर्य व्यक्त केले. लगेच पत्रकारांना आरोग्य केंद्रात पाचारण केले व संपूर्ण अव्यवस्थेची कल्पना देऊन दोषींवर कारवाईचे संकेत दिले. सभापतींच्या आकस्मिक भेटीने वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.डी.चाटे चांगलेच भांबावून गेले होते. यावेळी भेट रजिस्टरवर वडगाये यांनी नोंद केली. सभापतींच्या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित नव्हते. सर्वत्र कचरा व घाण पसरलेली होती. सर्व विभागाची पाहणी केली असता स्वच्छता नव्हती, कोणत्याही खोलीत झाडू मारला नव्हते, प्रत्येक वॉर्डात घाण पसरली होती. सामान अस्ताव्यस्त होते. स्त्री प्रस्तुती वार्डात एका खोलीत केवळ तीन प्रसुती झालेल्या रुग्णांना ठेवणे आवश्यक असताना सहा रुग्णांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे गर्दी निर्माण झाली होती. शौचालय, बाथरुममध्ये घाण पसरली होती. त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले होते. वापर केलेली औषधी, इंजेक्शन्स इतरत्र फेकलेले होते. शौचालयाचा दरवाजा तुटलेला होता. या वातावरणात रुग्ण बरा होण्यापेक्षा अधिकच बिमार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सभापती चांगलेच भडकले व डॉ.चाटे यांना धारेवर धरले. सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे देवरी-आमगाव मुख्य मार्गावर आहे. समाजकल्याण सभापती यांनी भेट दिली तेव्हा त्यांचेसोबत भाजपाचे जिल्हा महामंत्री परसराम फुंडे, भीमराज बोहरे, रमेश चुटे उपस्थित होते. आता दोषीवर कोणती कारवाई होते याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)रिक्त पदांची अडचण४यावेळी डॉ. चाटे यांनी सदर आरोग्य केंद्रात ए.एन.एम.चे एक पद, परिचर व सफाई कामगार यांचे पद रिक्त असल्याने सदर प्रकार होत असल्याचे सांगितले. सदर पदे भरतीसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. पुढील दोन दिवसात स्वच्छता करून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी हमी दिली. ४मुक्कामाला असलेल्या स्त्री रुग्णांना जेवणाचे डबे पुरविणाऱ्या स्त्रीला प्रत्येक डब्यामागे केवळ १० रुपये मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डब्बे घ्यायला परवडत नसल्याचे योगिता भलावी यांनी सांगितले.