शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

गोंदिया : नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई ...

गोंदिया : नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.१२) रात्री उशिरा करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये छत्रसाल ऊर्फ बंटी मोहन बानेवार (४८, रा. माळी मोहल्ला, चावडी चौक छोटा गोंदिया), लक्ष्मीनारायण ऊर्फ बाळू दिगंबर कुंभारे (५३, रा. साई खापर्डे कॉलनी, कुडवा) व राजेश गोपीचंद पाटील (५१, रा. आंबेडकर चौक, कुडवा) यांचा समावेश आहे.

नक्षलवाद्यांना शस्त्र पुरविणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी ७ जुलैला अटक केली होती.त्या घटनेचे धागेदोरे गोंदियापर्यंत लागले. त्यावेळी गोंदियातील घनश्याम आचले व विजय कोरेटी या दोघांना ७ जुलैला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात गोंदियातील आणखी तिघांना नक्षल समर्थक म्हणून अटक करण्यात आली आहे. बालाघाट जिल्ह्याच्या किरनापूर-किन्ही जंगलात नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याजवळून तीन पिस्तुल, तीन मॅक्झिन, एके ४७, आठ मोबाईल, चारचाकी असलेले दोन वाहने, एलईडी टॉर्च, हवा पंप, एमपीथ्री प्लेयर, पर्स, सुटकेस, कापड भरलेल्या तीन बॅग असा सामान जप्त करण्यात आला होता. नक्षलवाद्यांना पावसाळ्यापूर्वी ५ हजार काडतुसे, पिस्तुल, शस्त्रे दारुगोळा, शिबिर लावण्याचे साहित्य पुरविण्यासाठी एक कोटी रुपयांचा सौदा झाला होता. त्यातील ३० लाख रुपयांचे सामान मागील सहा महिन्यांत नक्षलवाद्यांना पुरविल्याची माहिती आहे. याप्रकरणात नक्षल समर्थक म्हणून काम करणाऱ्या गोंदियातील तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गोंदिया बालाघाट पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी, नक्षलविरोधी अभियान पथक गोंदियाचे शरद पाटील, बालाघाटचे पीएसआय उके यांनी केली आहे.

...........

बनावट नोटांचे कनेक्शन तपासणार

काही दिवसांपूर्वी बालाघाट पोलिसांनी ५ कोटी रुपयांच्या बनावट जप्त केल्या होत्या. या नोटांचा पुरवठा नक्षल्यांना केला जात असल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी गोंदिया येथील दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरविण्याच्या आरोपाखाली गोंदिया येथील तीन जणांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यामुळे या तिघांचे बनावट नोटांशी काय कनेक्शन आहे का याचा संदर्भ पोलीस तपासत आहे.