शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची औषधी जंगल शिवारात फेकली

By admin | Updated: November 29, 2015 02:36 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अररतोडी/परसटोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ...

कृषी विभागाचा प्रताप : शेतकऱ्यांना वाटप झालीच नाही?केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अररतोडी/परसटोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिरची व भाजीपाला पिकावर फवारण्यासाठी वाटप करण्यात येणारी लाखो रुपयांची औषधी शेतकऱ्यांना वाटप न करता कृषी सहायक औरासे व कृषीमित्र सुदाम कोवे यांनी जंगल शिवारात बेवारस फेकून दिली. बीट क्रमांक ८५२ मध्ये घडलेल्या या अफलातून प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी सरपंच मनिषा साखरे यांनी फेकलेल्या औषधीचा पंचनामा करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीविषयक चांगल्या योजना राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु कृषी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कर्तव्य न बजावता शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ करीत असतात. अरततोंडी/परसटोला येथे घडलेला प्रकार अशाच प्रकारामधील आहे.मिरची व भाजीपाला पिकावर फवारण्यासाठी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणारी रुची एक्झाडिरेक्टीव्ह, रुची सायडर, आरबीपीएसबी, रुची बीबीसी, रुची फ्लोरेसेन्सपी या लाखो रुपयांच्या औषधीचे पॅकेट, बॉटल शेतकऱ्यांना वाटप न करता जंगल शिवारात फेकून दिल्याचा अफलातून प्रकार कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केला. या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी तुमडाम आणि कृषी मंडळ अधिकारी नवेगाव(बांध) यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. सरपंच आणि गावातील नागरिकांनी कृषी मित्राच्या घरी गोठ्यात ठेवण्यात आलेल्या व फेकण्यात आलेल्या औषधीचा पंचनामा करून या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.परसटोलाचे सरपंच यांंनी या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन केशोरीला देऊन संबंधीत व्यक्तीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)