शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

४१ मजुरांची लाखोंची मजुरी १५ महिन्यांपासून थकीत

By admin | Updated: May 16, 2015 01:23 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील ४१ मजूर मागील १५ महिन्यांपासून मजुरीपासून वंचित आहेत.

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील ४१ मजूर मागील १५ महिन्यांपासून मजुरीपासून वंचित आहेत. पोटाला चिमटा मारुन रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मजूरांना कामाचा मोबदला अजूनपावेतो मिळाला नाही. त्यामुळे ४१ मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. तालुका स्तरावरील अधिकारी वेळ मारुन नेण्याची भूमिका बजावित असल्याचे दिसून येत आहे. याबाबत मिळालेल्या महितीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील ग्रामपंचायतच्या वतीने दोन तलावाचे खोलीकरणाचे काम फेब्रुवारी २०१४ तसेच जून २०१४ या कालावधीत करण्यात आले. सदर काम जवळपास सहा ते सात आठवडे करण्यात आले. गावातील शेकडो मजूर कामावर होते. काही महिन्यानंतर मोजक्याच मजूरांना कामाचा मोबदला मिळाला. परंतु अजूनही ४१ मजुरांची जवळपास लाख रुपयांची मजुरी थकीत आहे. गेल्या १५ महिन्यांपासून मजुरांना रोहयोची मजुरी अजूनपावेतो मिळाली नसल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. हाताने कमवून पानावर खाणाऱ्या मजुरांना १५ महिन्यांपासून रोहयोच्या कामाची मजुरी त्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने ४१ मजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.४१ मजुरांचे ९५ हजार ५०४ रुपये मागील १५ महिन्यांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मजुरी मिळाली नसल्याने त्या मजूरांवर उपासमारीची पाळी आली आहे. रोहयोची मजुरी मिळण्यास वर्षाचा विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन मजुरी त्वरित देण्याची मागणी गावातील मजुरांनी केली आहे. (वार्ताहर)