शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST

नरेश रहिले गोंदिया : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक अधिनियमाच्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी ...

नरेश रहिले

गोंदिया : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक अधिनियमाच्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनांना अडविण्याची गरजच आता राहिली नाही. सद्य:स्थितीत प्रत्येक वाहतूक पोलिसाच्या हातात ई-चालानकरिता मोबाईल देण्यात आला आहे. या मोबाईलमधील ॲपवर संबंधित वाहनाच्या क्रमाकांचे छायाचित्र काढले जाते. हे छायाचित्र काढताच त्या वाहन चालकाच्या मोबाईलवर दंडाचा एसएमएस जातो. परंतु, अनेक लोक आपले मोबाईल क्रमांक वारंवार बदलत असल्याने त्यामुळे त्या वाहनचालकाला आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आणि आपल्याला दंड ठोठावण्यात आला हेदेखील माहिती नसते. त्या वाहनावर हजारो रुपयांचा दंड जमा होऊन जातो. त्यामुळे त्या दंडाची वसुली कशी करणार हा प्रश्न आहे. गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शाखेने ई-चालानद्वारे दंड ठोठावला जातो. परंतु, अनेक लोक दंड भरत नसल्याचे पुढे आले आहे. गोंदिया जिल्ह्यात ई-चालन झालेले ९५ टक्के लोक दंड भरतात हे मात्र खरे.

.........................

कसे फाडले जाते ई-चालान

१) जिल्हा वाहतूक शाखेकडे ई-चालानकरिता ॲप देण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप डाऊनलोड करतात. रस्त्यावर ड्युटी करताना ज्या वाहन चालकाकडून नियम तोडले जातात, त्या वाहनाचे छायाचित्र काढून दंडाचा एसएमएस त्या वाहनचालकाच्या मोबाईलवर पाठविला जातो. त्यामुळे वाहनचालकांची गोची होत आहे.

..........

२) ई-चालानच्या मेसेजमध्ये संबंधित वाहन चालकाने नो पार्किंग, सिग्नल तोडणे, भरधाव वेगात गाडी चालविणे, ट्रीपल सीट अशा नियमांचा भंग केला हे त्यात नमूद केले जाते. दंडाची रक्कम किती हे सुद्धा त्या मेसेजमध्ये सांगण्यात येते. केलेला दंड वाहनचालक कुठेही भरू शकतात.

............................

मोबाईल अपडेट केला आहे काय?

- वाहन खरेदी करतानाच मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे.

-परिवहन विभागाकडे आपल्या वाहनाच्या क्रमांकासाेबत मोबाईल क्रमांकही जोडला जातो.

- अनेकजण मोबाईल क्रमांक बदलतात. त्यामुळे समस्या येत आहे.

.....................

दंडाची थकबाकी वाढली

- जिल्हा वाहतूक शाखेकडून यापूर्वी नियम तोडल्यास लगेच त्या वाहन चालकाला पकडून त्याच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली जात होती.

- आधीच्या प्रकारामुळे वाहन चालकांकडून वेळीच दंड वसूल होत होता.

-आता ई-चालानमुळे संबंधित वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करतात.

.............

सन---------- झालेला दंड------------------- वसूल दंड

२०१९-------- ८३२००००-------------------७९६४८००

२०२०-------- ८४२११५०-------------------७७३५५५०

२०२१ जुलै--- ३३१६६५०-------------------३१६७०५०

...........................

कोट

वाहतूक नियम मोडणाऱ्यांची गय केली जात नाही. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडे पैसे नसतील तर त्यांचा गाडी नंबर, कोणत्या कलमान्वये कारवाई केली, लोकेशन आणि त्याचे तडजोड शुल्क व नमूद असलेल्या मोबाईलवर मेसेज पाठविला जातो.

- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया.