शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो भक्त झाले भावविभोर

By admin | Updated: November 11, 2016 01:34 IST

वृंदावन धाम प्रांगणात ३ ते ९ नोव्हेंबरपर्यंत साध्वी ऋतंभरा यांच्या सुमधूर भजन, सारगर्भित विवेचन व मोहक

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाची सांगतागोंदिया : वृंदावन धाम प्रांगणात ३ ते ९ नोव्हेंबरपर्यंत साध्वी ऋतंभरा यांच्या सुमधूर भजन, सारगर्भित विवेचन व मोहक कथाप्रसंगांनी विभूषित श्रीमद भागवत पुराणाच्या प्रवचनांचा हजारो भक्तांनी लाभ घेतला व आपले जीवन पवित्र केले. त्यांच्या सुमधूर वाणीने हजारो भाविकांना भावविभोर करून सोडले.समापणाच्या दिवसी सुदामा चरित्र, परिक्षित मोक्ष, सुखदेव पूजन, कथा विराम, व्यास पूजन, महाआरती, गीतापाठ, हवन पूर्णाहुती आदी बाबी पार पडल्या. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचे आई-वडील, कुटुंबीय, आयोजक घनश्यामदास मसानी, सुशीला मसानी, अरूण मसानी, त्रिवेणी मसानी, संजयसिंह मसानी, ज्योती मसानी, रेखा जनरलसिंंह ठाकूर, कल्पना कर्नल रनवीरसिंह, साधना शिवराजसिंह चव्हाण यांच्यासमक्ष सामाजिक धर्मप्रेमी समुदायाने उपस्थित राहून महाआरती हवन पूर्णाहुतीमध्ये सहभाग घेतला.यानंतर साध्वी ऋतंभरा यांनी सुनील केलनका, मसानी परिवार यांना सन्मानपत्र देवून वात्सल्यधाम वृंदावनात येण्याचे निमंत्रिण दिले. याप्रसंगी महाआरतीनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी सात दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञासाठी आल्याबद्दल साध्वींचे आभार मानले. तसेच नोटांचे चलन बंद केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत ही काळाबाजार करणाऱ्यांची समाप्ती असल्याचे सांगितले. तसेच साध्वींच्या सुमधूर प्रवचनांनी भावविभोर झालेल्या त्यांच्या पत्नी कोकिळा शिवराजसिंह चव्हान यांनी आपल्या माहेरी भागवत करण्यासाठी साध्वी ऋतंभरा यांना विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. याप्रसंगी अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. हवनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला.कार्यक्रमासाठी खा. नाना पटोले, मधुसूदन अग्रवाल, राजू वालिया, प्रेम जायस्वाल, भीकम शर्मा, पम्मू भादुपोते, गुड्डा गुप्ता, अशोक सिंघानिया, हरीश दुबे, पवन गुप्ता, जुगणू बग्गा, नीरज ठाकूर, गोपाल नरेश अग्रवाल, विक्की खंडेलवाल, मोंटू जैन, कुशल अग्रवाल, कार्तिक चव्हाण, अजय अग्रवाल, लालू शर्मा, संतोष राठी, दिनेश गुप्ता, पिंटू खंडेलवाल, विजय बिडवाईक, सुधीर बजाज, प्रकाश काथरानी, भावन कुंदनानी, वृषभ गुप्ता, बंटी शर्मा, जय चौरसिया, देवेश मिश्रा, राहुल सिंघानिया, शंकर अग्रवाल, वंदना पाठक, दिनेश शर्मा, दिनेश गुप्ता, अमित गुप्ता, नितीन जैन, सतीश पारधी, योगिता मिश्रा, प्रेमनारायण मुंदडा, अशोक सिंघानिया, पूजा तिवारी, चांदनी गुप्ता, महेश आहुजा, मनोहर आसवानी आदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)