शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकाच्या खुनातील तिसऱ्या आरोपीस अटक

By admin | Updated: May 29, 2017 01:51 IST

सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटातील वनरक्षक रविंद्रसिंग जतपेले (५०) रा. सालेकसा यांचा वनतस्करांनी २३ मे च्या रात्री उभारीने मारून खून केला.

१ जूनपर्यंत पोलीस कोठडी: लाकडे चोरून नेतांना पकडल्याचा रागलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटातील वनरक्षक रविंद्रसिंग जतपेले (५०) रा. सालेकसा यांचा वनतस्करांनी २३ मे च्या रात्री उभारीने मारून खून केला. या संदर्भात तिसऱ्या आरोपीला सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वनरक्षक रविंद्रसिंह जतपेले (५०) आपली ड्युटी करून २३ मे रोजी रात्री ८.३० वाजता दरम्यान सालेकसा येथे मोटार सायकलने घरी परत जात होता. त्यांची मोटारसायकल हळूवार जात असताना आरोपींनी मोटार सायकल धावत असताना त्यानच्या डोक्यावर उभारीने मारून खाली पाडून ठार केले. नंतर मृतदेह मोटार सायकलने नाल्याजवळ नेवून टाकले. या प्रकरणात सहा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यात रेवाराम शेषराम नागपुरे (२२) रा. गोवारीटोला (सालेकसा) व रविंद्र धनराज उईके (२७) रा. पिपरीया या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता या प्रकरणात पिपरीया येथील हंसराज चैनलाल उईके (२१) याचा समावेश असल्याचे लक्षात आल्याने शुक्रवार (दि.२६) मे रोजी हंसराजला अटक करण्यात आली आहे. वनरक्षकाच्या खुनातील तिसऱ्या आरोपीस अटक करण्यात आली. वनतस्करी करणाऱ्या लोकांनी आपला हेतू साध्य होत नसल्याचे पाहून वनरक्षक जतपेले यांचा खून केला. सदर आरोपींविरूध्द सालेकसा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.