शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिकरण व विकासाच्या नावावर जंगलतोड झाली

By admin | Updated: June 26, 2017 00:25 IST

संपूर्ण जमिनीच्या ३३ टक्के भुभागावर जंगल आवश्यक आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जंगले होती.

अनिल सोले : वृक्षारोपण कार्यक्रम, लाभार्थ्याना गॅस वाटप लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : संपूर्ण जमिनीच्या ३३ टक्के भुभागावर जंगल आवश्यक आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जंगले होती. परंतु औद्योगिकरण व विकासाच्या नावाने जंगलतोड झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रात २०.४४ टक्के जंगल राहीलेले आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे, असे मत प्रा. आमदार अनिल सोले यांनी केले. तिरोडा येथे आलेल्या वृक्षदिंडीचे स्वागत करुन डॉ. छत्रपती दुबे नगर परिषद शाळेत आयोजीत वृक्षारोपणाच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, फॉरेस्ट आॅफीसर शेंडे, कदम, मुख्याधिकारी विजयकुमार देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले उपस्थित होते. यावेळी शालेय परिसरात विविध प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले. नंतर कार्यक्रमाचे छोट्या सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी गॅस कनेक्शनचे वितरण ही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. गॅस एजेसीचे मालक प्रामुख्याने उपस्थित होते. आ. विजय रहांगडाले यांनी शहरात वृक्षांची संख्या कमी आहे. वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगराध्यक्ष व न.प.सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून राजकारणासोबतच समाजकारण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर आमदार फुके यांनी १ ते ७ जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक नगराध्यक्ष देशपांडे यांनी मांडले. संचालन जंगल विभागाचे पटले यांनी केले. आभार उपाध्यक्ष पालांदूरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नगर परिषद सभापती अशोक असाटी, नरेश कुंभारे, श्वेता मानकर, सदस्या राखी गुणेरिया, संतोष मोहने, विजय बंसोड, अनिता अरोरा, द्वारका भोडेकर, प्रभु असाटी, रश्मी बुराडे, भावना चवळे, ममता हट्टेवार, अजयसिंह गौर, जगदिश कटरे, किरण डहाटे तसेच न. प. अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.