शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षकासाठी सहा तालुक्यांचे प्रस्तावच नाही

By admin | Updated: September 4, 2014 23:53 IST

आदर्श शिक्षक या पुरस्कारप्राप्त शिक्षकाला एक वेतनवाढ दिली जात होती. त्यामुळे अनेकांची या पुरस्कारासाठी चढाओढ होती. मात्र मागील दोन वर्षांपासून शासनाने आदर्श शिक्षकाला एक वेतनवाढ देण्याचे

शिक्षक दिन : ११ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारगोंदिया : आदर्श शिक्षक या पुरस्कारप्राप्त शिक्षकाला एक वेतनवाढ दिली जात होती. त्यामुळे अनेकांची या पुरस्कारासाठी चढाओढ होती. मात्र मागील दोन वर्षांपासून शासनाने आदर्श शिक्षकाला एक वेतनवाढ देण्याचे बंद केल्याने आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील सहा तालुक्यांत उदासिनता दिसून आली आहे.शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने शासन गौरव करतो. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा गौरव करण्याकरीता दरवर्षी जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मागविण्यात येते. त्यानुसार यावर्षीही अर्ज मागविण्यात आले. परंतु शासनाने आदर्श शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याचे बंद केल्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये असलेल्या सहा तालुक्यातील शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्जचं केले नाही. प्राथमिक विभागातील शिक्षकांनी मात्र प्रत्येक तालुक्यातून अर्ज केले आहेत.यंदा गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे ११ शिक्षकांना शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. यात प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा रजेगाव येथील श्रीमती पी.पी.रणदिवे, गोरेगाव तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा हिरडामाली येथील यशवंत श्यामलाल भगत, तिरोडा तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगाव येथील मुख्याध्यापक चुन्नीलाल भाऊजी बोपचे, सडक/अर्जुनी तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा तिडका येथील मनोहर सोनू डोंगरे, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा अरततोंडी येथील के.ए. मेश्राम, देवरी तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार येथील सुरेश गजानन कश्यप, सालेकसा तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बाकलसर्रा येथील एम.एस. नागपुरे, आमगाव तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पदमपूर येथील शोभा देवेंद्रसिंह मच्छीरके, कला/संगीत विशेष पुरस्कार गोंदिया तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा कटंगीटोला येथील जयश्री निलकंठ सिरसाटे यांना देण्यात येणार आहे. तर माध्यमिक विभागातून आमगाव जि.प. शाळेतील महेंद्र भुवराज सोनवाने व जि.प. हायस्कूल कावराबांध येथील टी.बी. बावनकुळे यांना देण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)