शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

पदाधिकाऱ्यांच्या गावातच आरोग्य सेवेचे तीनतेरा

By admin | Updated: August 23, 2015 00:15 IST

जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवा आजघडीला पूर्णत: कोलमडली आहे.

रुग्णांची गैरसोय : वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता बोंडगावदेवी : जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवा आजघडीला पूर्णत: कोलमडली आहे. यामुळे मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा वाऱ्यावर असताना पदाधिकारी मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चन्ना/बाक्टी येथे जिल्हा परिषदेच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बोंडगावदेवी येथे आयुर्वेदिक दवाखाना व आरोग्य उपकेंद्र चालविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या या दवाखान्यावर जिल्हा परिषदेचे संपुर्ण नियंत्रण असते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण (नियामक) व आरोग्य सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य असतात. सध्या दोन्ही समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लागलेली दिसत आहे. परंतु गोरगरीब सामान्य जनतेला शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. तर पदाधिकारी पुढे येताना दिसत नाही. चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पदाला मंजुरी असल्याचे समजते. परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून तिथे तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजल्यासारखी गत झालेली दिसत आहे. तेथील डॉक्टर राजीव डोबे सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे पीएचसीचा कारभार पाहण्याची जबाबदारी येथील आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलसुंगे यांनी २२ जुन रोजी सांभाळली. डॉक्टर चन्नाला गेल्याने येथील दवाखाना डॉक्टरवीना पोरका झाला आहे. संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी येथील आयुर्वेदिक दवाखानाच्या एका डॉक्टरवर येवून ठेपली आहे. सध्या उच्च प्रशिक्षित डॉक्टरांचा अभाव असल्याने परिसरातील गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. येथील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविकांची बदली मोरगावला झाल्याने सध्या कंत्राटी आरोग्य सेवीकेवर आरोग्य उपकेंद्राची जबाबदारी आहे. नियमित आरोग्य सेविकेच्या अभावी परिसरातील महिला रुग्ण व गरोदर मातांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. गावात तसेच बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभागातील जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा कोलमडून सामान्य जनतेची गैरसोय होत असताना जिल्हा परिषदेचे संबंधित पदाधिकारी सुस्त असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)