शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मोजकेच केंद्र असल्याने ज्येष्ठांची होतेय परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लस देण्यास १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील ६ खासगी रुग्णालयांना सुध्दा मंजुरी देण्यात आली आहे तर १० सरकारी रुग्णालयातून लसीकरण केले जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी १६४ ज्येष्ठांना आणि दुसऱ्या दिवशी ४३४ जणांना लस देण्यात आली. 

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करा : आतापर्यंत ज्येष्ठांना दिली लस

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत एकूण १६ खासगी आणि सरकारी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावरुन लसीकरण केले जात आहे. मात्र ग्रामीण भागात लसीकरण केंद्राची संख्या कमी असल्याने गोंदिया शहरातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठांची परवड होत असून ही परवड दूर करण्यासाठी जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लस देण्यास १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील ६ खासगी रुग्णालयांना सुध्दा मंजुरी देण्यात आली आहे तर १० सरकारी रुग्णालयातून लसीकरण केले जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी १६४ ज्येष्ठांना आणि दुसऱ्या दिवशी ४३४ जणांना लस देण्यात आली. बुधवारी तिसऱ्या दिवशी या सर्व केंद्रावरुन ५५५ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन तीन तास ताटकळत राहावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्राची संख्या वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास नागरिकांना सोयीचे होईल. शिवाय त्यांना तालुका अथवा जिल्हा स्तरावर पायपीट करावी लागणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.  

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस