शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात अतिसाराचे ३०७ रुग्ण

By admin | Updated: August 12, 2014 23:48 IST

पावसाळ्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून जिल्ह्यात कुठे डायरियाची साथ तर पसरली नाही ना याची तपासणी करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात

गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक : आशा स्वयंसेविकांनी घेतल्या ६५ हजार बालकांच्या भेटीगोंदिया : पावसाळ्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून जिल्ह्यात कुठे डायरियाची साथ तर पसरली नाही ना याची तपासणी करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात डायरियाचे सर्वाधिक रूग्ण आढळले. संपुर्ण जिल्ह्यात यावर्षी ३०७ डायरियाच्या रूग्णांची नोंद करण्यात आली.गोंदिया जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ८४ हजार ९३८ बालकांच्या घरी भेटी देवून त्यांना डायरियाची लागन झाली आहे का याची शहनिशा करून घेण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी ६५ हजार ८०० बालकांपर्यंत आशा स्वयंसेविका आजतागायत पोहचल्या. यात डायरियाचे ३०७ संशयीत रूग्ण आढळले. तर १० रूग्ण डायरियाचे पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. केंद्रशासनाने ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ओआरएस चे पॅकेट वितरीत करण्याचे निर्देश दिले. मात्र त्यांनी ओआरएस चे पॅकेटच पाठविले नसल्याने महाराष्ट्र सरकारने या अतिसार पंधरवाड्याची मुदत पुढे ढकलून ३० आॅगस्ट पर्यंत केली आहे. आमगाव तालुक्यात ९ हजार ३८ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीट्ये होते. यापैकी ६ हजार ५७५ बालकांना भेटी देण्यात आल्या. १३३९ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. परंतु भेटी लिेल्या बालकांत एकही मूल डायरियाने ग्रसीत आढळला नाही.सालेकसा तालुक्यात ४ हजार ५१९ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते. यापैकी ५ हजार ४९५ बालकांना भेटी देण्यात आल्या. ९९९ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे ४३ संशयित रूग्ण होते. देवरी तालुक्यात ९ हजार २८५ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते. यापैकी ६ हजार ७७५ बालकांना भेटी देण्यात आल्या. ८५२ बालकांना ओआरएसची पाकिटे वाटप करण्यात आली. यात डायरियाचे ५ रूग्ण संशयित आढळले. सडक/अर्जुनी तालुक्यात ८ हजार ३५३ बालकांपैकी ४ हजार ७५० बालकांच्या भेटी घेण्यात आल्या. २००४ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे १ रूग्ण संशयित आढळला. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात ९ हजार ७०९ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते. यापैकी ९ हजार ८५४ बालकांना भेटी देण्यात आल्या. १५०५ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे रूग्ण आढळले नाही. गोरेगाव तालुक्यात ९ हजार १३१ बालकांपैकी ७ हजार ४१२ बालकांच्या भेटी घेण्यात आल्या. ३५९२ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे १३९ रूग्ण संशयित आढळले. गोंदिया तालुक्यात २३ हजार ६९८ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते. यापैकी १९ हजार ८१५ बालकांना भेटी देण्यात आल्या. ६१३३ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे ४६ रूग्ण संशयित आढळले. ८ रूग्ण डायरियाचे पॉझिटीव्ह आढळले. तिरोडा तालुक्यात ११ हजार २०५ बालकांपैकी ५ हजार १२४ बालकांच्या भेटी घेण्यात आल्या. त्यातील ११६६ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. डायरियाचे ७३ रूग्ण संशयित आढळले. (तालुका प्रतिनिधी)