शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून सुरू होते त्यांचे प्रेमसंबंध

By admin | Updated: May 20, 2014 23:46 IST

कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे याला त्याच्या पत्नी व तिच्या प्रियकराने जाळल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे आणखी गतीने फिरविली आहेत.

पेटविण्यासाठी रॉकेलचा वापर : घटनेच्या दोन दिवसांपूर्वी झाला होता वाद

गोंदिया : कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे याला त्याच्या पत्नी व तिच्या प्रियकराने जाळल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे आणखी गतीने फिरविली आहेत. या प्रकरणातील अनेक बाबी आता पुढे आल्या आहेत. संजय खोब्रागडेला जाळण्यासाठी या आरोपींनी पेट्रोलचा नव्हे तर रॉकेलचा वापर केला होता असे सुद्धा समोर आले. पोलिसांकडे आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खोब्रागडे यांची पत्नी देवकाबाई (४५) व राजू गडपायले (४१) यांचे मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. याची माहिती जखमीला मिळाल्याने घटनेच्या दोन दिवसाआधी राजू गडपायले व संजय खोब्रागडे यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून राजू गडपायले व देवकाने संजयला संपविण्याचा विचार केला. गावातील सरपंच महिलेच्या घरी लग्न असल्याने गावातील लोक घरी राहणार नाही, त्या दिवशी याचा अखेरचा दिवस ठरवू असे त्या दोघांनी ठरविले. सरपंच महिलेच्या घरी असलेल्या लग्न समारंभात आरोपी राजू गडपायले हा देखील गेला होता. परंतु तो लग्नातून सरळ संजय खोब्रागडेच्या घरी परतला. सरपंच महिलेच्या पुतण्याचे लग्न असल्याने गावातील सर्व जातीधर्माचे लोक या लग्न समारंभात गेले होते. राजू गडपायले लग्नातून संजयच्या घरी आला तेव्हा देवका घराच्या कोपर्‍यावर उभी होती. पलंग आडवा टाकला होता. आपल्या संबंधाची माहिती संजयला झाली तेव्हापासून संजय आपल्याला त्रास देत असल्याचे देवकाने राजूला सांगितले. त्याचा बंदोबस्त करणे जरूरी आहे असे देवकाने म्हटल्यावर त्या दोघांनी त्यांच्याच घरात असलेले रॉकेल संजयच्या खाटेवर असलेल्या वाकळीवर व इतर कपड्यांवर टाकले. झोपेत असलेल्या संजयला याची भणक लागण्याच्या आतच तिने एका काडीला कापड गुंडाळून आग लावली. तो पेटत असताना ते दोघेही काही क्षण पाहात राहिले. त्यानंतर राजू गडपायले तेथून निघून गेला. भाजत असताना संजय स्वत:ला लागलेली आग विझविण्यासाठी जमिनीवर लोटत असताना देवकाने आपण अडकू नये यासाठी पाणी आणून त्याच्यावर टाकले. त्यानंतर गावकरी गोळा झाले. या प्रकरणाचे नाट्य देवका व तिचा प्रियकर राजू गडपायले याने रचले. संजयचा कायमचा काटा काढण्याच्या नादात हे प्रेमीयुगल अडकले. (तालुका प्रतिनिधी)