शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

पहिल्या हिवाळी अधिवेशनात रखडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित केला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रखडलेला प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांना दिले होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्याची गरज होती. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सुद्धा यात काही विलंब झाला.

ठळक मुद्देविनोद अग्रवाल : प्रशासकीय मंजुरीनंतर हालचालींना वेग, आरोग्य सुविधेत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुधारित प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी म्हटले आहे. पहिल्या हिवाळी अधिवेशनात रखडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित केला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रखडलेला प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांना दिले होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्याची गरज होती. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सुद्धा यात काही विलंब झाला. सगळे अडथळे पार करत अखेर १५० विद्यार्थी क्षमतेच्या ६५० खाटांच्या नवीन प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आमदार विनोद अग्रवाल यांनी वेळोवेळी प्रकरणाचा पाठपुरावा कायम ठेवला तसेच विद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अनेकवेळा भेटी घेत प्रकरण मार्गी लावण्यासंबंधी विनंती केली होती. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया हे केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत असून केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के रक्कम यासाठी खर्च करणार आहे. यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले.

आरोग्य सेवा सुकर होणारगोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. गोंदियात बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या भरपूर आहे. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या व्यवस्था गोंदिया जिल्ह्यासाठी अपुरी पडत आहे. याचा अनुभव आपण सर्व कोरोंना परिस्थितीमध्ये अनुभवत आहेत. ६५० खाटांच्या क्षमतेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा नक्कीच सुकर होईल, असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीय