शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

नवतपातही तापमान ४० डिग्रीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

गोंदिया : वर्षातील सर्वाधिक तापणारे ९ दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवतपाला मंगळवारपासून (दि. २५) सुरुवात झाली आहे. मात्र, नवतपातही ...

गोंदिया : वर्षातील सर्वाधिक तापणारे ९ दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवतपाला मंगळवारपासून (दि. २५) सुरुवात झाली आहे. मात्र, नवतपातही जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आत असतानाही उकाड्याने मात्र जिल्हावासीय हैराण झाले आहेत. कधी ढगा‌ळ वातावरण तर कधी ऊन असे सध्याचे चित्र असून सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

यंदाचा उन्हाळा तसा ढगा‌‌ळ वातावरण व पावसाने दिलासादायक करून दिला. त्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच ढगा‌ळ वातावरण व पावसाने हजेरी लावल्याने महिना तेवढा भारी गेला नाही. मात्र, मंगळवारपासून (दि. २५) नवतपाला सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे वर्षातील सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांचा हा काळ असतो. यावरून नवतपात तापमान किती राहणार याचा अंदाज लावता येतो. मात्र, सध्या ढगाळ वातावरण असल्याने नवतपातही जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आतच नोंदले जात आहे. असे असले तरीही उकाड्याने मात्र जिल्हावासीय हैराण होत आहेत. अशात आता त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून कधी वरूणराजा बरसतो याचीच ते वाट पाहत आहेत.

-----------------------

शेतकरी हंगामाच्या तयारीला

७ जूनपासून मान्सून लागणार असल्याने आता शेतकरीही पावसाची वाट बघत आहेत. पाऊस पडला रे पडला की शेतकरी आपल्या शेतात राबण्यास तयार आहेत. पावसाने धरणीची तहान भागविली की शेतकरी त्यातून सोने काढणार. यामुळेच शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला असून पावसाची वाट बघत आहे.