बाराभाटी : आजही स्वदेशी खेळ हा सांघिक म्हणून प्रचलित आहे आणि म्हणूनच कबड्डीची किमया झळकते आहे. सांघिक खेळांनीच ग्रामीण खेळांची परंपरा जपली आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहीकर यांनी केले.
ग्राम बोळदे येथे नवयुवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचा शुभारंभ ताराचंद साऊस्कार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत प्रा. मुन्नाभाई नंदागवळी, रंजना राऊत, लैलेश शिवणकर, सुरेश परशुरामकर, नरहरी ताराम, नीळकंठ किरसान, लक्ष्मण शहारे, भोजराम किरसान, चंद्रशेखर रामटेके, रमेश चनाप, धनू जोशी, धानगुने आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानू प्रधान यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप किरसान यांनी केले. आभार धम्मदीप मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी अजय मेश्राम, मनोज ताराम, सुरेश राऊत, आशिष गौतम, शैलेष ताराम, आकाश गौतम, दीपक ताराम, योगेश जनबंधू, हितेश करचाल यांनी सहकार्य केले.