शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाला १० वर्षे कारावासाची शिक्षा

By admin | Updated: July 1, 2016 01:53 IST

नानाविध आमिषे दाखवून एका शिक्षकाने त्याच्याच वर्गातील एका मुलीचे दोन वर्षे शारिरीक शोषण केले.

प्रकरण विद्यार्थिनीवर अत्याचाराचे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालमोहाडी : नानाविध आमिषे दाखवून एका शिक्षकाने त्याच्याच वर्गातील एका मुलीचे दोन वर्षे शारिरीक शोषण केले. ही बाब त्या मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने याप्रकरणाची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी सदर शिक्षकाला १० वर्षांचा कारावास तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.सरस्वती विद्यालय जांभोरा ता.मोहाडी येथे कार्यरत शिक्षक हेमराज बाळकृष्ण मेश्राम (४४) याने त्याच शाळेत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला नानाविध आमिष देत तिच्या घरी जायचा. मुलीचे शिक्षक घरी येतात म्हणून या मुलीची आई या शिक्षकांचा सन्मान करायची. परंतु तुमची मुलगी त्या शिक्षकांसोबत फिरत असल्याची माहिती तिच्या आईला गावातून ऐकू आली. त्यानंतर तिने मुलीला विचारले असता त्या शिक्षकांशी माझे काही संबंध नसल्याची मुलगी सांगत होती. मात्र याप्रकरणी आईला संशय आल्याने तिच्या आईने तिला जांभोरा शाळेतून काढून करडी जिल्हा परिषद शाळेत दहाव्या वर्गात नाव दाखल केले. जुलै २०१४ मध्ये दुपारच्या सुमारास शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलवर संपर्क साधून तुमची मुलगी शाळेतून निघून गेल्याचे सांगितले. दरम्यान ६ मे २०१५ रोजी घरी कुणालाही न सांगता ती निघून गेली. यादरम्यान तिचा तीन दिवस शोध घेतला असता कुटुंबीयांना ती कुठेही आढळून आली नाही. ९ मे रोजी ती नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. तिथून तिला आणल्यानंतर विचारणा केली असता तिने जांभोरा शाळेचे शिक्षक हेमराज मेश्राम यांच्यासोबत साकोली येथील एका लॉजवर थांबली असल्याचे सांगितले.हेमराजने प्रेम असल्याचे सांगत पैसे व भेटवस्तु देत होता. एप्रिल २०१३ ते मे २०१५ या दोन वर्षाच्या कालावधीत त्याने अनेकवेळा अत्याचार केल्याचे मुलीने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर या कुटुंबीयांने मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (२), (फ) (आय), (एन) सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद केला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी पुराव्यानिशी जिल्हा न्यायालय दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी याप्रकरणात १० जणांची साक्ष तपासली. यात हेमराज मेश्राम हे दोषी सिद्ध झाल्याने त्यांना १० वर्षाचा कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.सुषमा सिंग यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)