शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकदिनी जि.प.समोर धरणे आंदोलन

By admin | Updated: August 31, 2015 01:38 IST

शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना कामचुकार असे अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावे तसेच शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी

ंगोंदिया : शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना कामचुकार असे अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावे तसेच शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी आ. कपिल पाटील शिक्षक दिनी मुंबईच्या कामगार मैदानावर एक दिवसाचा उपवास करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक भारती गोंदियातर्फे करण्यात आले आहे. तसेच सदर दिनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेसमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात शिक्षक मंत्र्यांनी शिक्षकांना वापरलेला अपमानास्पद शब्द मागे घ्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, आॅफलाईन पगार आॅनलाईन करावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, सरलची डोकेदुखी बंद करा, वर्ग एक ते आठवीच्या सर्व मुलांना मोफत गणवेश द्यावा, सर्व मुलींना उपस्थिती भत्ता एक रुपयांवरुन पाच रुपये करण्यात यावा, सावित्री, फातिमा, कैसलेस आरोग्य योजना सुरू करावी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, शिक्षणाचा हक्क साबूत ठेवा, शिक्षकाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. शिक्षक भारतीतर्फे शिक्षकदिनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर शालेय कामकाजानंतर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत. या धरणे आंदोलनाला शिक्षकांनी अधिक संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, जितेंद्र घरडे, परेश बिसेन, गुलाब मौदेकर, चक्रेल, के.एफ. बहेकार, संतोष बारेवार, सुखचंद बिसेन, नरेंद्र बांते, विलास डोंगरे व इतर सदस्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी )