शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुली चार कोटींच्या घरात

By admin | Updated: April 1, 2016 02:03 IST

मागील वर्षी नगर परिषदेने ५० टक्के कर वसुली करून ‘रेकॉर्ड ब्रेक’ केला होता. यंदा मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत

३१ तारखेला २५ लाखांची वसुली : दोन दिवसात आकडा आणखी वाढणारगोंदिया : मागील वर्षी नगर परिषदेने ५० टक्के कर वसुली करून ‘रेकॉर्ड ब्रेक’ केला होता. यंदा मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५० टक्केपर्यंत वसुली होऊ शकली नाही. तरीही चार कोटींच्यावर वसुली झाल्याची माहिती आहे. कर वसुली विभागाकडून वसुलीचे काम अजूनही जोमात सुरू असून ही वसुली ३१ मार्चमध्येच टाकली जाणार असल्यामुळे ५० टक्के वसुलीचा आकडा गाठण्यात किती यश येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मागील वर्षी नगर परिषदेने कं बर कसून कर वसुलीची मोहीम राबविली होती. अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच कर वसुलीच्या कामात हिरीरीने लागले होते. याचे फलीतही तसेच मिळाले व नगर परिषदेने ५० टक्के कर वसुली करून दाखविली. पालिकेच्या इतिहासात एवढी वसुली पहिल्यांदाच झाली असावी. यंदा मात्र कर वसुली विभाग कोठेतरी कमकुवत दिसून येत आहे. मागील वर्षी ११ कोटींचे टार्गेट असताना उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली होती. यंदा नऊ कोटी ५० लाखांचे टार्गेट असताना विभाग मात्र कमी पडत आहे. ५० टक्के कर वसुलीचे टार्गेट सर करण्यासाठी पालिकेला यंदा चार कोटी ७५ लाखांची कर वसुली करणे गरजेचे झाले आहे. मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पालिकेची चार कोटींच्या वर कर वसुली झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पालिकेला आणखी ७५ लाख रूपयांची वसुली करणे गरजेचे आहे. हे सुद्धा शक्य होऊ शकते कारण शासकीय कार्यालयांकडून मोठी कर वसुली होणे बाकी असल्याची माहिती आहे. असे झाल्यास मागील वर्षीप्रमाणे यंदाही ५० टक्के कर वसुलीचे टार्गेट सर करता येऊ शकते. (शहर प्रतिनिधी)