शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

दहशतीखाली तेंदूपत्ता संकलन

By admin | Updated: May 21, 2015 01:09 IST

एका महिन्यापुरता का होईना, हजारो कुटुंबांना रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ता तोडाईच्या कामाला गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.

गोंदिया : एका महिन्यापुरता का होईना, हजारो कुटुंबांना रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ता तोडाईच्या कामाला गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली हजारो मजूर जंगलात तेंदूपत्ता तोडतानाचे दृश्य बघायला मिळत आहे.गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात तेंदूपत्ता गोळा करणे हाच व्यवसाय आहे. उन्हाळा आला की, कंत्राटदाराच्या दिवाणजीचे निमंत्रण केव्हा येते, याची ही कुटुंबे चातकासारखी वाट बघतात. ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने तसेच मजुरांना रोजगार मिळत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून तेंदूपत्ताचा व्यवसाय अविरत सुरू आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयात तेंदू विभाग असतो. या भागात तेंदू हंगामाला मे महिन्यात प्रत्यक्ष सुरूवात होते. १५ ते २० दिवसांचा हा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर महिन्यात तेंदू युनिटच्या लिलावाची जाहिरात विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होेते.यानंतर आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बडे कंत्राटदार आदिवासीबहुल भागात लिलावासाठी दाखल होतात. वनविभागाने तेंदू युनिटचा लिलाव केल्यानंतर मे महिन्यात तेंदू संकलनाच्या कामाला सुरुवात होते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतीवर राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर या तोडाईच्या कामात स्वत:ला गुंतवून घेऊन चार पैसे जमवायचे, असा क्रमच जणू ठरुन गेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील हजारो कुटुंब जादा पैसे मिळावे म्हणून या तेंदू संकलनाच्या काळात जिल्ह्यात दाखल होतात. या जिल्ह्यातील आदिवासी जनता हेच काम करतात. पण येथे काम जास्त व हात कमी अशी स्थिती असते म्हणून कंत्राटदार बाहेरुन मजूर आणतात. तेंदू पानाचे काय करतात. हे शहरी भागातील लोकांना माहिती नसेल. शहरातील लोकांना सिगारेट परिचयाची आहे. मात्र बिडीची त्यांना ओळख नाही. ग्रामीण भागातील लोकांना सिगारेट ओढणे परवडत नाही म्हणून ते बिडी पितात. ग्रामीण भागात बिडी प्रसिद्ध आहे. तेंदूच्या पानापासून बिडी तयार करण्यात येते.आदिवासी कुटुंबातील लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंतचे लोक तेंदू संकलनाचे काम करतात. मुलामुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य, सावकारांचे देणे, वर्षभराचे आर्थिक नियोजन आदी विविध कामे तेंदूच्या मजुरीतूनच करण्यात येतात. तेंदू वेचताना सत्तर पानांचा एक पुडा याप्रमाणे एका मजुराला दिवसाला शंभर पुडके करुन द्यावे लागतात. काही कंत्राटदार मजुरांची आर्थिक लूट देखील करतात. तेंदुपत्ता व्यवसायात उद्योजक कोट्यावधीश झाले तर तेंदू संकलनाचे काम करणारे मजुर मात्र आजही अर्धपोटी राहत आहे. हा तेंदूपत्ता मजुरावरील अन्याय असून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम कुणीही केले नाही. मागील दहा वर्षात विदर्भातील तेंदूपत्ता घटक खरेदी केलेला ठेकेदार आणि मजुरांचा विचार केल्यास मजूर आहे त्याच ठिकाणी आहे. परंतु ठेकेदार मात्र मोठे झाले. ठेकेदार व मजुरांची दरी वाढत गेली.याकडे लक्ष कोण देणार? बिडी शौकीनांचे प्रमाण कमी होत असल्याने एका दृष्टीने या व्यवसायाला अखेरची घरघरसुद्धा लागली आहे. असे असले तरी हजारो आदिवासींची रोजीरोटी असलेला हा व्यवसाय पूर्व विदर्भात अविरत सुरू आहे.सध्या पहाटेपासून मजुर आपल्या मुलाबाळांसह जंगलात पाने आणण्यासाठी जात आहे. त्यांना अनेक वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो. मागील वर्षांपासून वन्यप्राण्यांचे झालेली हल्ले बघता मजुरामध्ये कुठेतरी भितीचे वातावरण आहे. मात्र न डगमगता पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. ईकडे आड आणि दुसरीकडे विहिर अशी स्थिती तेंदूपत्ता मजुरांची झाली आहे.याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)