शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

गणित पेटी उपयोगावरील शिक्षक प्रशिक्षणाची सांगता

By admin | Updated: January 23, 2017 00:27 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत समूह साधन केंद्र करटी बु. केंद्रात गणित पेटी उपयोग शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : १०० टक्के विद्यार्थी प्रगत होणे गरजेचे परसवाडा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत समूह साधन केंद्र करटी बु. केंद्रात गणित पेटी उपयोग शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले. केंद्राच्या नवोपक्रमशील केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या कल्पनेतून शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन दोन टप्यात करण्यात आले होते. पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण करटी बु. येथे तर दूसरा टप्पा जि.प. प्राथमिक शाळा बेरडीपार येथे घेण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत २५ निकषांपैकी सात निकष गणित विषयाचे आहेत. गणित विषयामध्ये १०० टक्के विद्यार्थी प्रगत होणे गरजेचे असल्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, नाणी-नोटा संकल्पना, घड्याळ, एकक, दशक, शतक संकल्पना, अपूर्णांक यावरील संबोध कसे सादर करता येथील, याकरिता गणित पेटी उपयोग शिक्षक प्रशिक्षण आर.बी. घोष केंद्रप्रमुख यांनी आयोजित केले होते. प्रशिक्षण वर्गाला आर.एस. शहारे, जे.के. डोंगरे, आर.टी. पटले यांनी मार्गदर्शन केले. गणितीय साहित्य जोडोबार, मॅथेमेटीक , सरपट गणित, स्थानिक किंमत दर्शविणारा तक्ता, परिमिती व क्षेत्रफळ, गणितीय आकार, संख्या रेखा, नंतर बॅलेन्स, मॅचिंग सेट, भूमितीय ठोकळे, तराजू, घन यांचा वापर मनोरंजक पद्धतीने अध्यापणार कसा करावा, हे प्रशिक्षणात शिक्षकांना सांगण्यात आले. प्रशिक्षणाला केंद्रांतर्गत शाळांतील शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्राध्यक्ष रहांगडाले, एल.एम. ढबाले, व्ही.डी. पटले, शीला पारधी, हेमंत बिसेन, संतोष ठाकरे, दिलीप हिरापुरे, विजय भगत, के.एम. चौधरी, पी.डी. देशमुख, पी.के. भगत, डी.डी. शहारे, अशोक रिनाईत यांनी सहकार्य केले. (वार्ताहर) केंद्रस्तरीय पथकाकडून होणार मूल्यमापन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवोपक्रशील केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी २५ निकष पडताळणीचा दुसरा टप्पा केंद्रात लवकर घेण्याचे नियोजित केले आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर त्याची दखल जिल्हास्तरावर घेण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील केंद्रातील सर्व शाळांचे केंद्रस्तरीय पथकामार्फत मूल्यमापन घेण्याचे नियोजित केले असल्याचे केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी सांगितले.