शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी विमानतळावरून टेकऑफचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी उड्डाण उपक्रमांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात दिल्ली येथील फ्लाय बिग कंपनीने या विमानतळावरून विमान सेवा करण्यास अनुकूलता दर्शविली. त्यामुळे पहिला टप्प्यात बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदोर-हैदराबाद अशी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रवासी विमान वाहतूक सेवेच्या टेकऑफचा मार्ग सुकर झाला आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच सुखद बाब आहे.बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी उड्डाण उपक्रमांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात दिल्ली येथील फ्लाय बिग कंपनीने या विमानतळावरून विमान सेवा करण्यास अनुकूलता दर्शविली. त्यामुळे पहिला टप्प्यात बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदोर-हैदराबाद अशी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला केवळ या मार्गावर एकच विमान सेवा देणार आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास त्यात वाढ केली जाणार असल्याची माहिती बिरसी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना न मिळाल्याने अडचण आली होती. पावसाळी अधिवेशनात खा. सुनील मेंढे यांनी गोंदिया येथील बिरसी विमानतळाच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले होते. विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा आणि मालवाहतूक म्हणजेच कार्गो सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने लवकर अडचणी दूर करण्यात याव्यार, अशी मागणी केली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटूनही ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती. मुख्यत्वे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या परवानगीसाठी प्रवासी वाहतुकीचा विषय रेंगाळत होता. तो लवकरात लवकर मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द दिला होता. त्यानंतर परवाना मिळाल्याने मार्ग सुकर झाला आहे. 

उद्घाटनासाठी ज्योतिरादित्य सिंधिया येणार - बिरसी विमानतळावरून या महिन्याच्या अखेरीस प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या सेवेच्या उद्घाटनाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया येणार आहेत. त्यांच्यासह इतरही मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

कार्गो सेवेसाठी प्रयत्न सुरू - बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यातून तांदूळ, तसेच भाजीपाला आणि फळांचीसुद्धा निर्यात करणे शक्य आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून असल्याने ही सेवा महत्त्वपूर्ण ठरू शकते त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ही सेवा सुरु होवू शकते. 

 

टॅग्स :Airportविमानतळ