शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्य समुपदेशनाचा लाभ घ्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST

गोंदिया : मागील दोन वर्षात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. सन २०१९ मध्ये भारतात १.३९ ...

गोंदिया : मागील दोन वर्षात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. सन २०१९ मध्ये भारतात १.३९ लाख लोकांनी आत्महत्या केली. पुढे २०२० मध्ये त्यात वाढ होऊन सुमारे १.६७ लाख लोक आत्महत्येचे बळी पडले. हे प्रमाण चिंताजनक आहे. या आत्महत्या करणाऱ्या नागरिकांमध्ये ७० टक्के प्रमाण हे ३० ते ४५ वर्षे या तरुण वयोगटातील होते. त्यामुळे जागतिक महासत्तेचे स्वप्न बघणाऱ्या भारत देशाची तरुण पिढी नैराश्याने जर आत्महत्या करीत असेल तर त्यावर मंथन करणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याने सरकारतर्फे जिल्हा पातळीवर मानसिक उपचार आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या मानसिक आरोग्य समुपदेशनाचा लाभ घ्या, असे प्रतिपादन येथील केटीएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आरोग्य प्रशासनामार्फत दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळत जनजागृती करण्यात येते असून यानिमित्त येथील कुंभारेनगरातील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये आयोजित जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारेनगर यूपीएससीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार वालेच्छा, नर्सिंग ऑफिसर रूपाली टोणे, समुपदेशक इंदूरकर व सुरेखा आझाद आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. हुबेकर यांनी, बहुतांश आत्महत्येचे कारण तपासले तर आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, व्यसन, नैराश्य, कौटुंबिक कलह आदी दिसून आले आहेत. त्यासाठी सुजाण नागरिकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे. या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजात असहायता, एकांतवास, अनिश्चितता, आर्थिक ताणतणाव, बेचैनी व नात्यातील दुरावा वाढला आहे. परिणामी चिंता, नैराश्य व झोपेचे विकार वाढले आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊन आत्महत्या वाढत आहेत. यावर प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य असून यासाठी वैद्यकीय सल्ला हवा असेल त्यांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर आपले समुपदेशन करून घेतले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाला रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.