शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पांढरीच्या ‘व्हिडिओ’वर कारवाई करा

By admin | Updated: August 26, 2015 01:43 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पांढरी येथील ग्रामविकास अधिकारी (व्हिडिओ) एम.एस. रामटेके यांचा भोंगळ कारभार जनतेसमोर उघड झाला आहे.

कॅशबुक रेकॉर्ड अर्धवट : कारवाईसाठी गावकऱ्यांनी केली मागणीपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पांढरी येथील ग्रामविकास अधिकारी (व्हिडिओ) एम.एस. रामटेके यांचा भोंगळ कारभार जनतेसमोर उघड झाला आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली असून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.अशा प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांद्वारे कुलूप लावण्यात आले होते. पंचायत समिती सडक अर्जुनी येथील उपखंडविकास अधिकारी झेड.बी. टेंभरे, नेताजी धारगावे, धमगाये, उगले व गावकऱ्यांच्या समोर सदर कुलूप उघडून चौकशी करण्यात आली. या प्राथमिक चौकशीमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याने नऊ महिन्यांपासून कॅशबुक न भरल्याचे आढळले. तसेच रेकार्ड अर्धवट भरलेला असून अंदाजे पाच लाख रुपये उचल केल्याचे दिसून आले. या पाच लाख रूपयांचा हिशेबच त्यांच्याकडे नाही. तसेच सरपंच व सचिव रेकार्डवर न नोंदवताच पैशाची उचल करतात. अशाच प्रकारे आणखी पैशाची उचल करण्यात आली आहे, पण व्हाऊचर क्रमांक दोनवर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची सही नाही. त्यामुळे या प्रकारामध्ये मोठेच गौडबंगाल असल्याची शक्यता गावकरी वर्तवित आहेत.मागील वर्षी सन २०१४ मध्ये १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभेने महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड केली होती. मात्र मागील वर्षभरापासून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचे कुठेही नाव नाही. त्यामुळे काही गावकऱ्यांना तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, हेच कळत नाही. सदस्यांचे तर प्रोसिडींग बुकवर नावच नाही. अशाप्रकारे ग्रामविकास अधिकाऱ्यांचे निष्काळजी व हलगर्जीपणाचे कार्य सुरू असूनही त्यांची केवळ प्राथमिक चौकशीच करण्यात आली. या चौकशीचा अहवाल येथील अधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना पाठविल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र अद्याप कसलीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या सदर ग्रामविकास अधिकाऱ्यावर तीन लाख रूपयांची रिकव्हरी निघत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.सध्या ग्रामविकास अधिकारी रामटेके पंचायत समितीच्या मिटींगला उपस्थित न राहता पांढरी ग्रामपंचायतमध्ये रेकार्ड दुरूस्ती करताना दिसत आहेत. याचे मुख्य श्रेय पंचायत समिती सडक अर्जुनी येथील काही अधिकाऱ्यांवर जात आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करून या परिसरातून स्थानांतरण करण्याची मागणी जोर पकडत आहे. आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)