शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकावर कारवाई करा

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात भात खाचरच्या कामांसाठी गोरेगाववरून प्रतिनियुक्तीवर आलेले कृषी सहायक नाना ईलमे यांनी ...

काचेवानी : तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात भात खाचरच्या कामांसाठी गोरेगाववरून प्रतिनियुक्तीवर आलेले कृषी सहायक नाना ईलमे यांनी विकास कामांच्या नावे भकास काम करून दैनंदिनीमध्ये खोटी माहिती दर्शविली. याची लेखी सूचना तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोंदिया यांना देण्यात आली असून त्यांनी विभाग स्तरावर पोलिसांत तक्रार दाखल करावी अन्यथा आम्ही तक्रार नोंदवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.नाना ईलमे यांनी आली दैनंदिनी मंडळ कृषी अधिकारी व पर्यवेक्षक चोपा यांना सादर केली. यात शेतकऱ्यांच्या शेतात जावून काम करण्यापूर्वी मोजमाप करणे, यंत्रधारकांना कामे समजावणे व नंतर झालेल्या कामाचा शेतकऱ्यासमोर मोजमाप करण्याचे सांगितले आहे. तसेच बरबसपुरा व काचेवानीची कामे मार्चअखेर पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु बाळू पारधी हे कामावर होते. बरबसपुरा गावातील भागरथा भाऊजी चौधरी यांच्या शेतात कामाचे भूमिपूजन सरपंच ममता लिचडे, ग्रामपंचायत सदस्य नरेश असाटी, शिक्षक नेतराम माने, पर्यवेक्षक के.आर. रहांगडाले, कृषी सहायक नागदेवे, शेतकरी शंकर चौधरी यांच्या उपस्थितीत २६ जानेवारीला करण्यात आले. तर काम २९ मार्च ते एप्रिल म्हणजे शून्य महिन्यात करण्यात आले. काही दिवसानंतर एप्रिल महिन्यात कामे करण्यात आले, त्यावे ळी कृषी सहायक नाना एस. ईलमे उपस्थित नव्हते. ईलमे यांनी काम करताना सरपंच व इतर शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. अनेक शेतात मातीकाम न करता बिल काढण्यात आले. काम केल्यानंतर त्या गटधारक शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे महत्वाचे होते. परंतु कामाचे मोजमाप केल्याबाबत व काम पूर्ण केल्याबाबत कृषी सहायक ईलमे यांनी स्वाक्षरी घेतली नसून दैनंदिनीमध्ये चुकीचे दर्शविण्यात आले आहे.एलटीसीचा (महाराष्ट्र दर्शन) लाभ घेणे, घरच्या नोकरी समारंभात नोकरी (कामे) दाखविणे अशा अनेक चुका आहेत. इतर कागदपत्रात चुकीचे अभिलेख जोडून कृषी विभाग, अधिकारी व शासनाची दिशाभूल कृषी सहायक एन.एस. ईलमे यांनी केली आहे. वरिष्ठांनी चौकशी करून गुन्हा नोंदवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)