शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विभाग नियंत्रक राज्य परिवहन भंडारा यांच्यावर कारवाई करा

By admin | Updated: June 7, 2017 00:21 IST

राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगाराद्वारे २१ जानेवारी २०१७ रोजी शाळेला कोणतीच सुट्टी नसताना सुद्धा

जैन यांची मागणी : खोटी माहिती पुरविल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क देवरी : राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगाराद्वारे २१ जानेवारी २०१७ रोजी शाळेला कोणतीच सुट्टी नसताना सुद्धा मानव विकास योजनेची निळी स्कूल बस क्र.९३०८ ला शालेय फेरीत न चालविता फक्त प्रवाशांच्या वाहतूकीस चालविल्या. परंतु माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत खोटी माहिती पुरविण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नरेश जैन यांनी केली आहे. या बाबत मानवविकास समितीचे विशेष निमंत्रीत सदस्य नरेशकुमार स्वरुपचंद जैन यांनी विभाग नियंत्रक रा.प.भंडारा यांना सदर तक्रार केली असता त्यांनी त्या तक्रारीवर कसलीही शहनिशा न करता संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षेपासून वाचविण्याकरिता व जैनच्या तक्रारीला खोटे पाडण्याकरिता सदर दिवशी सदर बस पंक्चर झाल्याची खोटी व चुकीची माहिती जैन यांना दिली. नरेश जैन यांचे कोणतेच समाधान न झाल्यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत सदर विषयी माहिती मागितली असता सदर बस सदर दिवशी पंक्चर बिघाडग्रस्त झाली नसल्याची माहिती जनमाहिती अधिकारी रा.प.गोंदिया यांनी जैन यांना पुरविली. यानंतर पुन्हा जैन यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये सदर बसची जानेवारी २०१७ मध्ये आगारात व मार्गस्थ बिघाड अथवा पंक्चर बाबतची माहिती विचारली असता सदर वाहन संपूर्ण जानेवारी २०१७ मध्ये आगारात व मार्गस्थ बिघाड अथवा पंक्चर झालेले नसल्यामुळे सदर वाहनाची ब्रेक डाऊन रजिस्टरवर नोंद नाही. या प्रकारची माहिती जनमाहिती अधिकारी रा.प.गोंदिया यांनी जैन यांना पुरविली. यामुळे नरेश जैन यांना आश्चर्याचा धक्का बसला. विभाग नियंत्रक रा.प. भंडारा यांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीच चौकशी न करता खोटी माहिती का दिली हा शोधाचा विषय आहे. सदर चौकशी करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी जैन यांनी जिल्हा नियोजन अधिकारी जिमाविस गोंदिया, आयुक्त मानवविकास आयुक्तालय औरंगाबाद,महाव्यवस्थापक (वाहतूक) रा.प.मुंबई यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे नरेश जैन यांनी पुराव्यासह तक्रार केल्यावरही त्यांच्या तक्रारीवर दखल घेण्यात येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.