शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही कारण न विचारता शिक्षकाच्या निलंबनाचा आदेश

By admin | Updated: September 15, 2015 04:22 IST

गेल्या २२ वर्षांपासून शिक्षण विभागात पूर्णवेळ सेवा देत असलेल्या एखाद्या शिक्षकाला कोणतीही पूर्वकल्पना न देता

गोंदिया : गेल्या २२ वर्षांपासून शिक्षण विभागात पूर्णवेळ सेवा देत असलेल्या एखाद्या शिक्षकाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कारणे दाखवा नोटीस न देता नियमबाह्यपणे तडकाफडकी निलंबित करण्याचा प्रताप गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे. यामागे राजकीय पदाधिकाऱ्यांचा सूड असल्याची चर्चा सुरू आहे. अशा मनमानी कारभारामुळे जि.प. प्रशासनाच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तिरोडा पंचायत समितीअंतर्गत करटी केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येथे सहायक शिक्षक असलेले एन.एल. माने यांना जि.प. प्रशासनाने तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश काढला. अशा पद्धतीने कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसताना आणि आपली बाजू मांडण्याची संधी न देता एकाएकी निलंबनाचा आदेश कसा काय काढला, असा प्रश्न निलंबित शिक्षक माने यांनी उपस्थित केला आहे. गेल्या २२ वर्षांपासून विद्यादानाचे कार्य करण्याचे हेच फळ का? असा प्रश्न त्यांनी केला. आपल्यावरील या कारवाईत शासनाच्या शिस्तविषय नियमांची, कायद्याची, अधिनियमांची ऐसीतैसी केली आहे. अशा पद्धतीने झालेली नियमबाह्य कृती ही गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिलीच असल्याचे माने यांनी सांगितले.एखाद्या गंभीर प्रकरणात दोषी असेल, संबंधित कर्मचाऱ्यामुळे सार्वजनिक स्थळी गंभीर संकट निर्माण होण्याची भिती असेल, वातावरण तापण्याची शक्यता असेल अशा वेळी त्या कर्मचाऱ्याचे स्थानांतर केले जाते. अपवादात्मक परिस्थितीत निलंबत केले जाते. पण शिक्षक माने यांच्या बाबतीत अशी कोणतीही परिस्थिती नसताना त्यांना निलंबित केल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.माने यांच्यावर वीज चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात ज्या घरात वीज वापरल्या गेली ते घर त्यांच्या आईच्या नावावर आहे. असे असताना माने यांच्यावर वीजचोरीचा आरोप लावण्यात आला. विशेष म्हणजे हे प्रकरण फौजदारी नसून तडजोडीचे आहे. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईस ते कारणीभूत ठरू शकत नाही.(जिल्हा प्रतिनिधी)काय आहे नियम?४जिल्हा परिषद शिस्तविषयक अधिनियम १९६७ च्या नियम १९ (१) मध्ये नमुद केल्यानुसार, चारित्र्यासंबंधात आणि खासगी प्रकरणात दोषारोपण झाल्यास शिस्तभंग होतो, असे नाही. याशिवाय अभिलेखात हस्तक्षेप करणे, भ्रष्टाचार, चोरी, खून, बलात्कार, अफरातफर अशा गंभीर गुन्ह्यात अडकल्यानंतर तपासकार्यात बाधा निर्माण होणार नाही याकरिता त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते. मात्र माने यांच्यावर पदकार्याशी संबंधित कोणताच गुन्हा नोंद नाही. तरीही एकतर्फी निलंबनाची कारवाई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.