शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:27 IST

येरंडी ग्रामपंचायतच्या मतदारयादीत असलेल्या घोळ प्रकरणात तक्रार करुनही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी निर्णय न घेतल्यामुळे....

ठळक मुद्देभंडारी नवे तहसीलदार : येरंडी ग्रा.पं. निवडणूक प्रकरण भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येरंडी ग्रामपंचायतच्या मतदारयादीत असलेल्या घोळ प्रकरणात तक्रार करुनही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी निर्णय न घेतल्यामुळे त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी बुधवारी (दि.८) निलंबित केले आहे. तहसीलदारांचा कार्यभार गोंदियाचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सी.आर. भंडारी यांना सोपविण्यात आला असून ते गुरुवारी (दि.९) येथे रुजू झाले आहेत.प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार होत्या. यात येरंडीचा समावेश होता. निवडणुकीचा प्रस्तावित दिनांक १६ आॅक्टोबर होता. ७ फेबु्रवारी रोजी नमुना ६ मध्ये अर्ज सादर करुनही विशीष्ट दिनांकापर्यंत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाºयांकडून निर्णय न झाल्यामुळे १ जुलैच्या मतदारयादीमध्ये नावांचा समावेश करण्यात आला नाही. अशी तक्रार ८ सप्टेंबर रोजी ५९ लोकांनी केली होती. या कारणामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये येरंडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली होती. त्यामुळे १६ आॅक्टोबर रोजी येरंडी ग्रामपंचायतची निवडणूक होऊ शकली नाही. तालुक्यातील इतर ३९ ग्रा.पं.च्या निवडणूका पार पडल्या.राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रं.रानिआ/ग्रापनि-२०१७/ प्रक्र-१८/का-८ दि.६ नोव्हें.२०१७ नुसार परिच्छेद क्रं.१३ मध्ये नमूद केल्यानुसार तहसीलदार डी.सी. बांबोर्डे हे महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील भाग-दोन (निलंबन) नियम ४ नुसार कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करुन त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.या आदेशाचे पालन करीत महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४ च्या उपनियम (१) (क) अन्वये विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी बोम्बार्डे यांना शासन सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांना भंडारा मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.९) तहसीलदार पदाचा अतिरिक्त प्रभार गोंदियाचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारी यांनी घेतला आहे.