शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोळी झाडणाऱ्या आरोपीचे आत्मसमर्पण

By admin | Updated: June 15, 2015 00:42 IST

गोंदिया नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे नेते व जुन्या बस स्थानकाजवळील रहिवासी छेदीलाल इमलाह (४६) यांची ...

छेदीलाल इमलाह हत्याकांड : गोंदियात कडकडीत बंद, तणावपूर्ण शांततागोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे नेते व जुन्या बस स्थानकाजवळील रहिवासी छेदीलाल इमलाह (४६) यांची जुन्या भांडणावरून दोन दुचाकीस्वारांनी शनिवारी सायंकाळी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. या घटनेमुळे गेल्या २४ तासात गोंदिया शहरात तणावसदृश परिस्थिती आहे. दरम्यान इमलाह यांच्यावर गोळी झाडणाऱ्या शाहरूख खान (२१) रा.यादव चौक या आरोपीने शनिवारी रात्री ९.१० वाजता पोलिसात आत्मसमर्पण केले तर येशूदास सुधाकर हरपाल (२३) रा.सतनामी मोहल्ला, गोंदिया या दुसऱ्या आरोपीला रविवारी पोलिसांनी अटक केली. या घटनेमागे जुनी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे संंबंधित सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून ईमलाह यांच्या समर्थकांनी रविवारी गोंदिया बंदचे आवाहन केले होते. त्यासाठी शहराच्या अनेक भागात त्यांचे समर्थक दिवसभर फिरत होते. त्यामुळे कोणीही दुकान उघडले नाही. कोणतीही अनुचित घटना होऊन नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून शहरात सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.दोन महिन्यांपूर्वी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणाचा संबंध छेदीलाल इमलाह यांच्या हत्येशी असल्याची चर्चा होत आहे. नगर परिषदेच्या अस्थायी सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी छेदीलाल इमलाह नेहमीप्रमाणे आंबेडकर चौकात सायंकाळी ६ वाजता दुचाकीने फेरफटका मारण्यासाठी आले होते. पाठक कँटीनसमोर ते उभे असताना चेहरा झाकून असलेले दोन युवक दुचाकीने तिथे आले. छेदीलाल यांना कसलीही संधी न देता पिस्तूलमधून त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली. यात छेदीलाल इमलाह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर त्या युवकांनी तेथून पळ काढला.छेदीलाल यांचे बंधू भीम लक्ष्मण इमलाह यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींमध्ये नगरसेवक पंकज यादव व त्यांचे बंधू लोकेश उर्फ कल्लू यादव रा.यादव चौक (गोंदिया) यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांच्याच सांगण्यावरून व जुन्या वादातून इमलाह यांची हत्या करण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र त्यात किती तथ्य आहे याची तपासणी पोलीस करीत आहेत. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४; अनुसूचित जाती-जमाती अपराध प्रतिबंध कायद्याच्या कलम ३ (२) व भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)चायनिज बनावटीची रिव्हॉल्व्हर जप्तया घटनेत हल्लोखोर युवकांनी चायनिज बनावटीची पिस्तुल वापरली. रविवारी दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर इमलाह यांना मारण्यासाठी वापरलेली ती पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली. ती पिस्तुल त्यांच्याकडे कुठून आली, त्याचा परवाना त्यांच्याकडे होता का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.आधी अटक करा, मगच मृतदेह उचलूइमलाह यांच्या मृतदेहाचे रात्रीच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. मात्र जोपर्यंत संशयित यादव बंधूंना अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेत इमलाह यांच्या समर्थक व नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केटीएस रुग्णालयाच्या आवारात धरणे देणे सुरू केले. सोबतच आंबेडकर चौकात काही वेळासाठी रास्ता रोको केला.नाना पटोलेंनी केले जमावाला शांतदरम्यान खासदार नाना पटोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी रुग्णालयाला भेट देऊन ईमलाह समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. संशयित सर्व आरोपींना अटक केली जाईल, एवढेच नाही तर पोलीसवाले यात दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अन्यथा आपणही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरू, असे आश्वासन यावेळी खा.पटोले यांनी जमावाला दिले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच गोंदिया बिहारसारखे झाले असून आपण हे प्रकार थांबविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे खा.पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वेळ पडल्यास या घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.