शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीचे आत्मसमर्पण

By admin | Updated: January 20, 2015 22:38 IST

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सापळा रचून केलेल्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीने गोंदियाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी (दि.१९) आत्मसमर्पण केले.

गोंदिया : वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सापळा रचून केलेल्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीने गोंदियाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी (दि.१९) आत्मसमर्पण केले. विनोद गोविंदा सारंगपुरे (३४) रा. श्रीनगर असे त्या समर्पित आरोपीचे नाव आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या सागाची लाकडे वाहतूक करणाऱ्या मिनी मेटॅडोअरला (एमएच ३५/के-२२७१) पकडले. ही कारवाई रविवारी (दि.१८) रात्री ८ वाजता गोंदियाच्या निर्मल टॉकिजजवळ करून मिनी मेटॅडोअर चालक व मालक राजेश बाबुलाल सोनुले (४२) रा. फुलचूर याला अटक करण्यात आली होती. मात्र कारवाईदरम्यान त्याच्या साथीदाराने पळ काढला होता. त्या फरार आरोपीने स्वत:च गोंदिया वन परिक्षेत्र कार्यालयात येवून आत्मसमर्पण केले. त्यामुळे राजेश व विनोद या दोघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात हजर करवून एक दिवसाची वनकोठडी मिळवून घेतली.दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितलेल्या माहितीवरून गोंदियाच्या वाजपैयी वार्डात धाड घालून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे साठविलेली लाकडे जप्त केली. शिवाय लाकडांच्या सालीसुद्धा जप्त केल्या. मात्र पुरेशा वेळेअभावी व मनुष्यबळाअभावी त्या लाकडांची मोजणी सद्यस्थितीत होवू शकली नसल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम यांनी सांगितले. काही लाकडे अंजनाची असून त्यांची तपासणी सध्या सुरू आहे. (प्रतिनिधी)