शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

उमेदवारीसाठी दावेदारांची दमछाक

By admin | Updated: June 9, 2014 23:41 IST

लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम संपले. महायुतीचे केंद्रात शासन आल्यानंतर त्या चर्चा आता संपल्या. सध्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेचे यश-अपयश

संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगावलोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम संपले. महायुतीचे केंद्रात शासन आल्यानंतर त्या चर्चा आता संपल्या. सध्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेचे यश-अपयश विसरून सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. सध्या इच्छुक उमेदवारांना विधानसभेच्या उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या कुवतीप्रमाणे ‘फिल्डींग’ लावण्याच्या कामात मश्गुल आहे. अर्जुनी/मोरगाव मतदारसंघात भाजपात उत्साह संचारला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी आपापल्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीत गप्पा मारतांना दिसणारे आता दिसेनासे झाले आहेत. एकंदरीत लोकसभेच्या निकालानंतर आघाडी पक्षात धास्ती भरली आहे. २00९ च्या परिसिमनानुसार अर्जुनी/मोरगाव तालुका लाखांदूर विधानसभेतून बाहेर पडून अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील मोहाडी मंडळ क्षेत्र मिळून अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राची निर्मिती झाली. तसे हे तालुका कुठल्याही एका राजकीय पक्षाचे बालेकिल्ले नाहीत. येथे संमिश्र प्रतिसाद मिळतो. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. परिसीमनानंतर २00९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव करत पहिल्यांदा खाते उघडले. अर्जुनी/मोरगाव तालुक्यावर तशी खा. नाना पटोले यांची पकड आहे.गत निवडणुकीत पटोले यांच्या प्रभावामुळे भाजपचे आ. राजकुमार बडोले निवडून आले. परंतु उपरोधिक भाषेत साडे चार वर्षाच्या कार्यकाळात हे क्षेत्र कुपोषित राहिले. नजीकच्या कंत्राटदारांना खूष करण्यासाठी चावड्या, सभा मंडप, रस्ते दुरूस्ती यापलीकडे विशेष अशी विकासकामे या मतदारसंघात झाली नाही. मोजके कंत्राटदार गब्बर झाले. आमदारांनी मतदारसंघातील काही गावे दत्तक घेतली. मात्र ती जशी साडेचार वर्षापूर्वी होती तशीच आजही आहेत. आमदार निधीचा पैसा दत्तक गावांच्या किती कामात आला. हा संशोधनाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदारांचा विरोध बर्‍याच गावात दिसू न आला होता. भाजपच्या बर्‍याच कार्यकर्त्यांनाही त्यांची अँलर्जी आहे. या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी याच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी सरसावले आहेत. आघाडी पक्षाच्या युतीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. भाजपचे खा. नाना पटोले यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसला योग्य नेतृत्वतच लाभले नाही. काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी या क्षेत्राची धुरा आ. गोपालदास अग्रवाल व आ. रामरतन राऊत यांचेकडे सोपविण्यात आली. मात्र सततच्या दुर्लक्षामुळे येथे काँग्रेस दुबळी झाली आहे. काही प्रमाणात याचा राष्ट्रवादी काँग्रेसने लाभ उचलला. दहा वर्षापूर्वी मतदार व कार्यकर्ते नसलेली राष्ट्रवादी येथे मजबूत झाली आहे. हे शल्य सच्या काँग्रेसजनात होते. अशा मतदारांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला धडा शिकविला. काँग्रेसचा उमेदवार सुध्दा राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल ठरवितात. हा येथील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारात सूर दिसून येतो. त्यादृष्टीने त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी अनेकांनी लोकसभा निवडणुकीत पुढे-पुढे केली. काँग्रेसकडे इच्छुकांची लांबलचक यादी आहे. अ.जा.प्रवर्गात अनेक जातींचा समावेश होत असल्याने दलिता व्यतिरीक्त या प्रवर्गात समाविष्ट होणारे सुध्दा त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. महायुती व आघाडीनंतर बहुजन समाज पक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मतदारसंघातील काही गावांमध्ये बसपा कॅडरची गढ्ढा मते आहेत. दोन्ही राजकीय पक्षानंतर बसपाला तिसर्‍या क्रमांकाची मते मिळतात. दोन्ही प्रमुख राजकीय प.क्षाच्या उमेदवारांना शह देण्यासाठी बसपा उमेदवारांना घाम फोडू शकते. मात्र उमेदवार कसा असेल यावर अवलंबून आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या मतदारसंघात तेवढे अस्तित्व नाही. त्यामुळे या पक्षाच्या उमदेवाराचा इतर उमेदवारावर परिणाम होईल असे चित्र आजघडीला तरी नाही. प्रत्येक राजकीय पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची लांबलचक यादी आहे. उमेदवारी देतांना प्रचंड मनस्ताप होणार आहे. अनेकांची मनधरणी सुध्दा करावी लागेल. एवढे असूनसुध्दा मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंडखोरीचा नेमका कुठल्या उमेदवारावर परिणाम होईल यावरच निकाल अवलंबून असणार आहे.