शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकगृहात शिकणार विद्यार्थी

By admin | Updated: June 19, 2016 01:33 IST

जवळील सुरगाव-चापटी येथील जिल्हा प्राथमिक शाळेकडे कुणाचेही लक्ष नाही. निमगाव केंद्रांतर्गत येणारी ही शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग नाही

सुरगाव येथील प्रकार : शिक्षण विभागाचे शाळेकडे दुर्लक्ष बाराभाटी : जवळील सुरगाव-चापटी येथील जिल्हा प्राथमिक शाळेकडे कुणाचेही लक्ष नाही. निमगाव केंद्रांतर्गत येणारी ही शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग नाही म्हणून येथील विद्यार्थी स्वयंपाकगृहात शिकणार असल्याची माहिती आहे. सदर शाळेत मागील २०१५-१६ सत्रात फक्त तीन विद्यार्थी व एक शिक्षक होते. या सत्रासाठीही एकच शिक्षक येणार असेही समजते. सदर शाळेची इमारत उभी आहे. पण सुसज्ज नसून त्यात दरवाजे व खिडक्या नाहीत. इमारतीचा आतील भाग खूपच खराब असून तेथेच शौच व लघुशंका केल्याचे दिसते. या गावातील लोकसंख्या ५०० जवळपास आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते शिक्षण मिळत नाही. इमारत अस्वच्छ असून त्यात विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. शाळेचे कार्यालय कोठे हे सुद्धा समजत नसून शाळेतील कागदपत्रे कोणती हे सुद्धा कळायला मार्ग नाही. असे असतानाही शाळा सुरूच आहे. यातून शिक्षण विभागाचे या शाळेकडे किती लक्ष आहे यातून दिसून पडते. परिणामी काही गावकरी आपले पाल्य बाहेर शिकवितात. शाळा सुधारली नाही तर मुलांची इच्छा अशा शाळेत जायची होणार का? असा प्रश्न विद्यार्थी व पालक करतात. शिक्षकांचा पगार मिळतो म्हणून ते नोकरी करतात. मग शाळेचे भवितव्य कसेही होऊन जावो, त्याला काय? अशाही शाळा राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री असलेल्या विधानसभा क्षेत्रात आढळतात. स्वार्थी नेत्यांना कुणाची पर्वा नसते. त्यांना फक्त आपले कार्यच महत्वाचे दिसते यामुळेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असतानाही कुणाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष गेले नाही. (वार्ताहर)शाळेकडे लक्ष द्याशाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणतात आम्हाला निदान अक्षर ओळख होऊ द्या. क,ख,ग, शिकू दया, आमचे हक्क व अधिकारासाठी पाठबळ दया. मात्र ही शाळा की कोंडवाडा असे चित्र इमारतीचे आहे. त्यामुळे शाळा सुधारा, दुरुस्त करा, लक्ष घाला, कानाडोळा करु नका, शिक्षण विभागाने हात घालावे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.