शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक

By admin | Updated: July 14, 2016 01:53 IST

बेला येथील आर.बी. जयस्वाल व्यवसायीक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

मान्यता नसतानाही दिला प्रवेश : पोलिसांकडे तक्रार दाखल भंडारा : बेला येथील आर.बी. जयस्वाल व्यवसायीक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यात प्रती विद्यार्थी ७० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी भंडारा पोलिसात आज तक्रार दाखल केली. भंडारा येथील ग्रामीण विद्या विकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आर.बी. जयस्वाल व्यवसायीक व औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेला येथे सुरु आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबईची मान्यता असल्याची बतावणी करून संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीशियन व फिटर या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला. तत्पूर्वी सदर संस्थाचालकांनी दहावी पास विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम दोन वर्षाचे असल्याचे सांगितले होते. सदर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पास करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला प्रशिक्षण संस्थेकडून डिप्लोमा देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिल्याने त्यांनी येथे प्रवेश घेतला होता. या सोबतच त्यांना शासनाकडून शिष्यवृत्तीही प्राप्त होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अनेकांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप संतप्त विद्यार्थ्यांनी लावला आहे. संस्थाचालकांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आज मंगळवारला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, यशवंत सोनकुसरे, मुकेश थोटे, रमेश माकडे आदींच्या नेतृत्वात कपील राखडे, राकेश मते, मयूर बालपांडे, वैभव उरकुडे, टेकराम आगाशे, धनंजय आगाशे आदी विद्यार्थ्यांनी भंडारा पोलिसात संस्थाचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामुळे संस्थाचालकाचे धाबे दणाणले असून प्रशिक्षणार्थ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरु असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)