गोंदिया : अमर शहीद विरांगना महाराणी अवंतीबाई लोधी जयंती समारोह समितीच्यावतीने अवंतीबाई यांची १८५ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे या जयंती कार्यक्रमानिमित्त समितीच्यावतीने वृक्षारोपण, रॅली, रक्तदान व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासारखे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम समाजातील वरिष्ठ समाजसेवी रूपचंद ठकरेले, शिवराम सवालाखे, रामेश्वर लिल्हारे, दयाराम तिवडे, खेमराज दवारे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात समाजातील ७० युवक-युवतींनी रक्तदान केले. त्यानंतर माजी खासदार कंकर मुंजारे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती छाया दसरे, विमल नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, विठोबा लिल्हारे, कुंदन कटारे, रजनी नागपुरे, विराजवंती नागपुरे, अर्जुन नागपुरे, शंकर नागपुरे, देवेंद्र मच्छीरके, लीलाधर सुलाखे, टिटूलाल लिल्हारे, टी.आर. लिल्हारे, योगराज उपराडे, डुलेश्वरी लिल्हारे, चुतुर्भुज नागपुरे, पन्नालाल मचाडे, मदन चिखलोंडे उपस्थित होते. याप्रसंगी मुंजारे यांनी, लोधी समाजाची एकता बघून हे शुभ संकेत असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान नवनिर्वाचीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन राजीव ठकरेले यांनी केले. आभार उमेश बम्भारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिवराम सवालाखे, कमलकिशोर लिल्हारे, अरविंद उपवंशी, संजीव ठकरेले, संजय नागपुरे व समाजबांधवांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
अवंतीबाई जयंती उत्सवाची सांगता
By admin | Updated: August 23, 2015 00:16 IST