शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बोदरा गावाला वादळीवाऱ्याचा तडाखा

By admin | Updated: September 8, 2014 00:34 IST

परिसरात रविवारी (दि.७) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पाऊस सुरू असताना एकाएकीच दुपारी १२ वाजतादरम्यान भयंकर स्फोटासारखा आवाज होऊन वादळीवाऱ्या जबरदस्त तडाखा बोदरा गावाला बसला.

बोंडगावदेवी : परिसरात रविवारी (दि.७) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पाऊस सुरू असताना एकाएकीच दुपारी १२ वाजतादरम्यान भयंकर स्फोटासारखा आवाज होऊन वादळीवाऱ्या जबरदस्त तडाखा बोदरा गावाला बसला. यात गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडांची पडझड होऊन विद्युत तारा तुटल्या. मात्र जीवित हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपासूनच पावसाने कहर केला. बोदरा गावाच्या शेजारीच असलेल्या उटखाळा या तलावातून ज्वालासारख्या दिसणारा गोळा निर्माण होऊन चक्रीवादळाने बोदरा गावावर कहर केला. यात मोठी झाडे मुळासकट घरांवर कोसळली. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील फायबर व टिनाच्या पत्र्यांद्वारे बनविलेले किचनशेड पूर्णत: भुईसपाट होऊन दूरवर फेकल्या गेले. तसेच समाज मंदिरावरील टिनचे शेड बऱ्याच लांब अंतरावर फेकल्या गेले. याशिवाय भाऊराव राऊत यांच्या घरावर झाड पडून त्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते. तर या वादळीवाऱ्यामुळे यामध्ये भाऊराव राऊत, तेजराम कांबळे, प्रभू राऊत, भाष्कर शहारे, केशव चौधरी, रेशीम चौधरी, जयदेव चौधरी, योगीराज चौधरी, शालू कांबळे, सदाशिव कांबळे, भागवत लंजे, अशोक लंजे, तुलाराम कांबळे, दुधराम कांबळे यांच्यासह २८ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चक्रीवादळाची माहिती मिळताच सरपंच जयवंता झोळे, उपसरपंच माधोराव झोळे, पो.पा. नाशिक कापगते, पं.स. सदस्य प्रमोद पाऊलझगडे, राजू पालीवाल, पोलिस निरीक्षक संदीप भागवत, तलाठी यु.एस. बागधरे यांनी नुकसानीची पाहणी केली. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एन.एच. टेंभरे, राठोड, विनोद बनकर, आनंदराव चौधरी यांनी क्षतिग्रस्त घरांची पाहणी केली. चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)