शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

भाकपचे रास्ता रोको

By admin | Updated: May 16, 2015 01:21 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या आवाहनानुसार गुरूवारी (दि.१४) पक्षाच्या गोरेगाव तालुका कौंसिलच्यावतीने ....

गोरेगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या आवाहनानुसार गुरूवारी (दि.१४) पक्षाच्या गोरेगाव तालुका कौंसिलच्यावतीने दुपारी १ वाजता बस स्थानक चौकातून भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. तसेच गोंदिया-कोहमारा मार्गावरील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.भू-संपादन कायदा सन २०१३ मध्ये करण्यात आला. त्याला सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. मात्र आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने देशी-विदेशी भांडवलदार, कारखानदार, भू-माफिया व बिल्डर्स लॉबीच्या हितासाठी एक नवीन कायदा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी अत्यंत घाईने संसदेच्या मंजुरीची वाट न पाहता एक अध्यादेश जाहीर केला, जो शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेसाठी अत्यंत घातक आहे. भूमिअधिग्रहण, पुनर्वसन व पुनर्स्थापनेत योग्य मोबदला आणि पारदर्शकता अधिकार कायदा २०१३ मध्ये दुरूस्ती करण्याच्या अध्यादेशाविरूद्ध व सन २०१३ मधील कायदा पूर्णत: कायम ठेवावे, अशा मागणीचे निवेदन पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावे शिष्टमंडळाने तहसीलदार गोरेगाव यांना दिले. सदर मोर्च्याचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, चरणदास भावे, चंद्रप्रकाश शेंडे, सुरेश बिसेन, परेश दुरूगकर, नारायण भलावी, दुलीचंद कावळे, राया मारगाये, गया क्षीरसागर, बिरन वाघाडे, डोमाजी बावणकर, धनलाल रंगारी, गुणंत नाईत यांनी केले. या वेळी मोदी सरकारचे भूमिअधिग्रहण बिल रद्द करा व सन २०१३ चे भूमिअधिग्रहण बिल कायम ठेवावे, शेतकरी-शेतमजूर याविरूद्ध बिल हाणून पाडावे आदी मागण्या मोर्च्याच्या वतीने करण्यात आल्या. सदर आंदोलनात पक्षाच्या ४७ कार्यकर्त्यांना अटक करून सुटकाही करण्यात आली. यात महिला-पुरूषांचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)