शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तोतया पीएसआयला अटक

By admin | Updated: May 23, 2015 01:40 IST

आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत असे सांगून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या...

गोंदिया : आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत असे सांगून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या तोतया पीएसआयला तिरोडा पोलिसांनी गुरूवारच्या रात्री अटक केली. विजय ऊर्फ विजू श्रीधर डुंभरे (३५) रा. भंडारा असे आरोपीचे नाव आहे.तिरोडाच्या आझाद वॉर्डातील सुनील चैनराज येरपुडे यांच्या दुकानात दिनेश खोब्रागडे नाव सांगून विजय डुंभरे रा.भंडारा आला. त्याने आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत. आपल्याला दोन सोन्याच्या साखळ्या हव्या आहेत, असे त्याने सांगितले होते. त्याने येरपुडे यांच्या दुकानातून २७.६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या घेतल्या. त्या साखळ्यांची किंमत ७६ हजार ३०२ रूपये झाली. त्याने याचे पैसे धनादेशाच्या रूपाने दिले. तो धनादेश जिल्हामध्यवर्ती बँक भंडारा येथील असून त्याचा क्रमांक २९६१७३ आहे. हा धनादेश खाते क्र. ७९१३ या क्रमांकाचा दुसऱ्याच व्यक्तीचा आहे. या प्रकरणात येरपुडे यांची त्याने फसवणूक केली. त्याच्याविरूध्द तिरोडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम४१९, ४२०, १७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. २० मे रोजीचा धनादेश त्याने दिला होता. त्याला तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे.