शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गटार योजनेच्या हस्तांतरणाला ‘स्टे’

By admin | Updated: December 3, 2015 02:00 IST

गोंदिया शहरातील गेल्या पाच वर्षांपासून मंजूर होऊन पडलेल्या पण कामास सुरूवात न झालेल्या भूमिगत गटार योजनेतील अडथळे अजूनही दूर झालेले नाहीत.

नगराध्यक्षांची याचिका : ८० कोटींची योजना १२४ कोटींवर, विलंबामुळे आणखी किंमत वाढणारगोंदिया : गोंदिया शहरातील गेल्या पाच वर्षांपासून मंजूर होऊन पडलेल्या पण कामास सुरूवात न झालेल्या भूमिगत गटार योजनेतील अडथळे अजूनही दूर झालेले नाहीत. ही योजना नगर परिषदेने न राबविता महाराष्ट्र जीवन प्राधीकरणनने राबवावी या राज्य शासनाच्या आदेशाला नगराध्यक्ष कशिश जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार न्यायालयाने ही योजना ‘मजीप्रा’कडे हस्तांतरित करण्याच्या शासनाच्या आदेशाला स्थगनादेश दिला आहे.नगराध्यक्ष जयस्वाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने हस्तांतरणाला स्थगिती दिल्यामुळे शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ८० कोटींची ही योजना आता १२४ कोटीवर पोहोचली असताना पुढे त्याची किंमत यापेक्षाही जास्त होणार आहे. पाच वर्षापूर्वी शासनाने ८० कोटी रुपये खर्चाच्या या भूमिगत गटर योजनेला हिरवी झेंडी दिली होती. हे काम सुरू करण्यासाठी शासनाने आतापर्यंत ५६ कोटी, ५७ लाख ३० हजार रुपये नगर परिषदेकडे हस्तांतरित केले. ही रक्कम २०१२ पासून नगर परिषदेच्या खात्यात पडून आहे. त्यावर न.प.ला चांगले व्याजही मिळत आहे. मात्र वेळीच गटार योजनेचे काम सुरू झाले नसल्यामुळे योजनेचा खर्च वाढून तो १२४ कोटींवर पोहोचला. आता पुन्हा कोर्टबाजी आणि राजकारण यामुळे ही योजना रखडण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत गोंदिया नगर परिषदेच्या आमसभेत तीन वेळा प्रस्ताव पारित करून ही योजना नगर परिषदेकडूनच अंमलात आणली जावी अशी मागणी करण्या आली. मात्र नगर परिषदेची आर्थिक स्थिती पाहता हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून केले जावे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सूचित केले होते. मात्र त्यानंतरही नगर परिषदेने आमसभेत ठराव घेऊन ही योजना आम्हीच राबविणार असे कळविले.वास्तविक नगर परिषदेचा हा ठराव शासकीय नियम आणि निर्णयाविरूद्ध असल्यामुळे कलम ३०८ नुसार तो रद्द करण्याचे अपिल न.प. सभापती राकेश ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचा तो ठराव खारीत करीत योजनेसाठी मिळालेला निधी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले. पण नगराध्यक्ष जयस्वाल यांनी जिलाधिकाऱ्यांच्या निर्देशाविरूद्ध उच्च न्यायालयात धाव घेतले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने २० नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगनादेश दिल्याचे सांगितले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)