शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:34 IST

शहरातील मुख्य चौक व मार्गांवर विविध राजकीय पक्षांचे पोस्टर, होर्डिंग लावण्यात आले होते. यामुळे शहराचे सौंदर्य लुप्त होत चालले होते. तर होर्डिंग लावताना थोर पुरूषांच्या पुतळ्यांचा सुध्दा विचार न करता त्यांच्या पुतळ्यांसमोर होर्डिंग लावून त्यांचा अवमान केला जात होता.

ठळक मुद्देहोर्डिंग,पोस्टर हटविले : निवडणूक आचारसंहिता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मुख्य चौक व मार्गांवर विविध राजकीय पक्षांचे पोस्टर, होर्डिंग लावण्यात आले होते. यामुळे शहराचे सौंदर्य लुप्त होत चालले होते. तर होर्डिंग लावताना थोर पुरूषांच्या पुतळ्यांचा सुध्दा विचार न करता त्यांच्या पुतळ्यांसमोर होर्डिंग लावून त्यांचा अवमान केला जात होता. मात्र नगर परिषदेकडून सुध्दा कुठलीच कारवाई केली जात नव्हती. होर्डिंग व बॅनरच्या युध्दामुळे थोर पुरूषांच्या पुतळ्यांना श्वास घेणे सुध्दा कठिण झाले होते. मात्र १० मार्चला लोकसभा निवडणुकीकरिता आचार संहिता लागू होताच हे सर्व पोस्टर, बॅनर, होर्डिंग हटविण्यात आल्याने पुतळ्यांनी सुध्दा मोकळा श्वास घेतला.लोकसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू होताच विविध राजकीय पक्षांचे होर्डिंग, पोस्टर, बॅनर तसेच मतदारांना प्रभावित करणारे शासकीय योजनांचे जाहीरातीचे फलक सुध्दा हटविण्यात येते. १० मार्चला सांयकाळी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हापासूनच आचार संहिता लागू झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्वरीत शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी लागलेले विविध राजकीय पक्षांचे होर्डिंग, पोस्टर, बॅनर हटविण्याचे निर्देश दिले.सोमवारी (दि.११) दिवसभर शहरातील होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर हटविण्याचे काम युध्द स्तरावर सुरू करण्यात आले. सर्व होर्डिंग, बॅनर, पोस्टर हटविल्याने शहराला पुन्हा पूर्वीचे सौंदर्य प्राप्त झाले.शहारात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. तर वाढदिवस व इतर कार्यक्रमाचे होर्डिंग लावताना थोर पुरूषांच्या पुतळ्यांचा सुध्दा विचार केला जात नव्हता. त्यांच्या पुतळ्यासमोर होर्डिंग लावून एक प्रकारे त्यांचा अवमान केला जात होता. मात्र हा सर्व प्रकार नगर परिषदेचे अधिकारी गप्पपणे पाहत होते. शहरातील नागरिकांनी यावर अनेकदा आक्षेप घेतला मात्र त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नव्हता. मात्र लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होताच हे सर्व होर्डिंग, बॅनर हटविण्यात आल्याने शहरवासीयांसह शहरातील थोरपुरूषांच्या पुतळ्यांना सुध्दा दिलासा मिळाला असून त्यांनी सुध्दा प्रथमच मोकळा श्वास घेतल्याचे चित्र होते.साडेतीन हजार होर्डिंग्ज बॅनर हटविलेलोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या तिन्ही मतदार संघातील विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांचे जाहीरातीचे फलक, होर्डिंग्ज हटविण्यात आले. सोमवारी दिवसभर धडक मोहीम राबवून साडेतीन हजारावर होर्डिग्ज,बॅनर हटविण्यात आले.तीन मतदार संघातून १४९२ पोस्टर, १०२५ बॅनर, १०३९ प्रसिध्द पत्रक हटविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक