शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांच्या दहशतीने एसटीनेही घेतली माघार

By admin | Updated: July 29, 2014 23:53 IST

नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून नक्षल सप्ताह सुरू झाला. त्यामुळे देवरी व सालेकसा तालुक्यांतील अतिसंवदेनशील भागात शेतीच्या कामांसह अनेक व्यवहार ठप्प पडले आहेत.

शहीद सप्ताह : गोंदिया आगाराच्या ३० तर साकोली आगाराच्या ११ फेऱ्या रद्दंगोंदिया : नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून नक्षल सप्ताह सुरू झाला. त्यामुळे देवरी व सालेकसा तालुक्यांतील अतिसंवदेनशील भागात शेतीच्या कामांसह अनेक व्यवहार ठप्प पडले आहेत. याशिवाय एसटी महामंडळानेही या सप्ताहाच धसका घेतला असून गोंदिया आगाराने ३० तर साकोली आगाराने ११ बसफेऱ्या रद्द केल्या आहेत.नक्षल्यांचा शहीद सप्ताह २८ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत राहणार आहे. या सप्ताहात नक्षली कारवायांना गती येवून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय अतीसंवेदनशील भागात लोकही या सप्ताहात घराबाहेर पडण्याचे टाळतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात बसफेऱ्या रद्द केल्या आहेत.दोन्ही आगारांच्या बसफेऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या नक्षल प्रभावित क्षेत्रात जाणार नाहीत. रा.प.च्या गोंदिया आगाराने या नक्षल सप्ताहात आपल्या एकूण ३० फेऱ्या रद्द केल्याने १७९७.२ किमीचा प्रवास बसेस करू शकणार नाही. त्यातच साकोली आगाराच्या काही बसफेऱ्या गोंदिया जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रात चालतात. त्यापैकी सहा फेऱ्या अर्धवटपणे तर पाच फेऱ्या पूर्णत: अशा एकूण ११ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे साकोली आगाराच्या बसेस गोंदिया जिल्ह्याच्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील आपला २२०० किमीचा प्रवास करू शकणार नसल्याचे साकोलीचे आगार व्यवस्थापक धोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गोंदिया आगाराच्या जिल्ह्यातील एकूण १० मार्गांवरील एकूण ३० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात सालेकसा ते चांदसूरजपर्यंतच्या फेऱ्या रद्द झाल्याने १११ किमीचा प्रवास रद्द, सालेकसा ते गल्लाटोलाच्या फेऱ्या रद्द झाल्याने ६६ किमीचा प्रवास रद्द, सालेकसा ते डोंगरगडच्या फेऱ्या रद्द झाल्याने ७१.१ किमीचा प्रवास रद्द, गोंदिया ते मलाजखंडच्या चार फेऱ्या रद्द झाल्याने ५३२ किमीचा प्रवास रद्द, बिजेपार ते डोमाटोलाच्या फेऱ्या रद्द झाल्याने ४८ किमीचार प्रवास रद्द, गोंदिया ते वंजारीच्या सहा फेऱ्या रद्द झाल्याने २४७ किमीचा प्रवास रद्द, गोंदिया ते खोलगडच्या सहा फेऱ्या रद्द झाल्याने २६० किमीचा प्रवास रद्द, सालेकसा ते नवाटोलाच्या आठ फेऱ्या रद्द झाल्याने २४४.८ किमीचा प्रवास रद्द, गोंदिया सालेकसा ते पिपरियाच्या सहा फेऱ्या रद्द झाल्याने १९९.२ किमीचा प्रवास रद्द तर फुक्कीमेटाच्या फेऱ्या रद्द झाल्याने १७.८ किमीचा प्रवास रद्द झाला. अशाप्रकारे गोंदिया आगाराच्या एकूण ३० फेऱ्या रद्द झाल्याने १७९७.२ किमीचा प्रवास बसेस करू शकणार नाही. काही ठिकाणी पोलीस संरक्षण किंवा ठाण्यांची परवानगी घेऊनच बसेस पुढे नेल्या जात असल्याचे साकोलीचे आगार व्यवस्थापक धोंडाणे यांनी सांगितले. साकोली आगाराच्या रद्द करण्यात आलेल्या अर्धवट फेऱ्यांमध्ये चिचगड-ककोडी-चिचगड, चिचगड-मगरडोह, देवरी-नक्टी, चिचगड-महाला, नवेगावबांध-चिचगड व केशोरी-राजोली या बसफेऱ्यांचा समावेश आहे. यातील चिचगड-ककोडी व चिचगड मगरडोह येथील फेऱ्या पोलिसांनी परवानगी घेवूनच्या पुढे नेण्यात येत आहेत. याशिवाय साकोली आगाराच्या पूर्णत: रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये साकोली-कुरखेडा, साकोली-रायपूर, साकोली-आलेवाडा-पद्मपूर, साकोली-चिचगड-कुणबीटोला व साकोली-देवरी-फुक्कीमेंढा या बसफेऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)