शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी मारली बाजी

By admin | Updated: January 18, 2017 01:18 IST

राष्ट्रीय अंध संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ व विविध क्रीडा

 १२ विद्यार्थ्यांची कोल्हापूर वारी गोंदिया : राष्ट्रीय अंध संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ व विविध क्रीडा स्पर्धांत येथील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत बाजी मारली. विशेष म्हणजे येथील भुमिता माहुर्ले या विद्यार्थिनीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित उपक्रमांतर्गत विशेष शिक्षकांनी या स्पर्धेसाठी १२ दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांची निवड केली होती. यात, ११ व्या वर्गातील तिरोडा येथील तौफीक महमूद सय्यद याने ११० मीटर धावने व गोळाफेक स्पर्धेत राज्यातून दुसरा, वर्ग ९ वीचा तालुक्यातील पांढराबोडी येथील होमेंद्र नागपुरे याने ५० मीटर धावन्यात दुसरा, वर्ग ९ वीची सडक-अर्जुनी तालुक्यातील भुमिता माहुर्ले हिने १०० व ८० मीटर धावने मध्ये तिसरा व चमचागोटीमध्ये राज्यातून पहिला, वर्ग ८ वीची अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मनिषा बाजीराव झोडे हिने १०० मीटर धावने मध्ये दुसरा, वर्ग १० वीचा सालेकसा तालुक्यातील रोहीत मोतीलाल दमाहे याने बुद्धीबळ स्पर्धेत राज्यातून दुसरा तर वर्ग १० वीचा प्रशांत उपराडे याने ५० मीटर धावने मध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. याशिवाय इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत या विद्यार्थ्यांसोबत अर्जुनी-मोरगावचे तालुका समन्वयक योगेश कापगते, विशेष शिक्षक विकास नेरकर, तिरोडाच्या विशेष शिक्षिका लिना चव्हाण व देवरीचे प्रमोद सिंगनजुडे होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र एक्स्प्रेसने परत आलेल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी रेल्वे स्थानकावर सपत्नीक स्वागत केले. विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंंडवार यांनी कौतूक केले. तर स्पर्धेसाठी जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, विलास मलवार, तालुका समन्वयक प्रदीप वालदे, गजानन धावडे, थानसिंह बघेले, भुषण सोनकांबळे, राजेश मते, खुशाल भोंगाडे, रविंद्र गुरनुले, रविंद्र सोनवाने, रमेश पटले, जगदीश राणे, संजय गलपल्लीवार आदिंनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)