शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सुरू झाली मान्सूनपर्व सफाई

By admin | Updated: June 2, 2016 01:15 IST

पावसाळा आता तोंडावर आला असून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावून आपल्या आगमनाचे संकेतही दिले आहेत.

जेसीबी व पोकलँडचा वापर : मोठ्या नाल्यांची आधी सफाई सुरूगोंदिया : पावसाळा आता तोंडावर आला असून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावून आपल्या आगमनाचे संकेतही दिले आहेत. पावसाचे हे संकेत बधून नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सूनपूर्व सफाई अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. २५ मे पासून शहरात हे अभियान सुरू झाले. सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून सांडपाणी वाहून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई सुरू आहे. पावसाळ््यापूर्वी शहरातील पाणी वाहून नेणारे मोठे नाले नगर परिषदेकडून जेसीबीच्या माध्यमातून साफ केले जातात. जेसीबीद्वारे या नाल्यांतील गाळ व कचरा काढून त्यांना मोकळे केले जाते, जेणेकरून त्यातून पावसाचे पाणी वाहून जावे व कुणाच्या घरात पावसाचे पाणी शिरू नये. त्यानुसार नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून २५ मे पासून शहरात मान्सूनपूर्व सफाई अभियानाला सुरूवात झाली आहे. याअंतर्गत शहरातील श्रीजी लॉन लगतचा नाला, बालाघाट रोड, टी-पॉईंट जवळील नाला, राजाभोज कॉलनी, कटंगी नाला, विवेकानंद कॉलनी, गणेशनगर स्टेट बँक कॉलनी व रिंग रोडवरील नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सफाईच्या या कामात शहरातील नाल्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण सफाई कामगारांसाठी डोकेदुखीचे ठरते. नाल्यांवरील बांधकामामुळे नाल्यांची योग्य प्रकारे सफाई होत नाही. परिणामी नाल्यांत गाळ साचून राहतो आणि नाल्यांतील पाणी रस्त्यावर येते. त्याचा फटका शहरवासीयांसह खालच्या भागातील रहिवाशांना बसतो.(शहर प्रतिनिधी)२० कामगारांसाठी मागविली निविदा मान्सूनपूर्व सफाई अभियानांतर्गत नगर परिषदेच्या सफाई विभागाकडून मोठ्या नाल्यांसाठी जेसीबी व पोकलँडचा वापर केला जात असला तरी लहान व मध्यम नाल्यांची सफाई कामगारांकडून करवून घेतली जाते. यासाठी विभागाने २० सफाई कामगारांसाठी निविदा मागविली आहे. निविदा उघडल्यानंतर ही माणसे उपलब्ध होणार व त्यांच्या माध्यमातून महत्त्वाच्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. वास्तविक ही प्रक्रिया आधीच होणे गरजेचे होते. मात्र उशिरा का असेना, नगर परिषदेला शहाणपण आले आहे.