शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजना सुरू करा

By admin | Updated: May 16, 2015 01:19 IST

गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे.

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यातच मागील तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेली ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू करण्यात न आल्याने पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. सदर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली तर नागरिकांना या भिषण पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल, अशी नागरिकांची मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर हे गाव आदिवासी दुर्गम भागातील गाव आहे. या गावात दरवर्षीच जानेवारी महिन्यापासून पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी भीषण टंचाई भाषत असते. भर उन्हाळ्यात गावातील बोअरवेल्स व विहिरींच्या पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावकऱ्यांवर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची पाळी येते. मात्र संबंधित प्रशासनाकडून या गावातील पाणी टंचाईकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे.गावकऱ्यांच्या विनंतीवरून २ एप्रिल २०१२ रोजी ग्रामसभेतील ठरावानुसार ग्रामीण पाणी पुरवठा योजनेला मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषद गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांना ठराव पाठविण्यात आले. त्यांच्याकडून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत बोरगाव-सुकपूर गावाला तांत्रिक मंजुरीनुसार ६ जुलै २०१२ रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र प्रशासन व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे त्या योजनेमार्फत अद्यापही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी जि.प. अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. तसेच निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, कार्यकारी अभियंता जि.प. गोंदिया, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करण्यासाठी तंमुसचे अध्यक्ष अशोक शेंडे, उपाध्यक्ष हेमराज ठाकूर, सदस्य विनराज मेश्राम, ऋषिपाल ठाकूर, मालीकराम ठाकूर, जगदीश मेश्राम अजीत गौंधर्य आदींनी मागणी केली आहे.सदर योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असून तीन वर्षांपूर्वीच काम बंद करण्यात आले होते. कोणतेही काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र तीन वर्षांचा कालखंड लोटल्यावरही काम अपूर्ण ठेवण्यामागे काय गौडबंगाल असावे, याबाबत गावकऱ्यांत चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत अर्ध्या गावात पाईप लाईन घालण्यात आले होते. मात्र पाणी पुरवठा सुरू न झाल्याने तीन वर्षांपासून ते तसेच होते. कालांतराने आता ही जुनी पाईप लाईन फुटली आहे. पाणी पुरवठ्यासाठी जुन्याच दोन टाक्या आहेत. मात्र ज्या विहिरीतून तिथे पाणी पोहोचते होणार आहे, त्या विहिरीवर अद्याप मोटार बसविण्यात आली नाही. या प्रकारामुळे बोरगाव-सुकपूरवासी अद्याप पिण्याच्या नळाच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)