शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मस्त्य बीज केंद्र सुरू करा

By admin | Updated: September 18, 2015 01:35 IST

गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात प्रख्यात आहे. म्हणूनच मत्स्य व्यवसायाला येथे मोठे उधान आलेले असते.

ेुसंस्थेची मागणी : तलावाच्या जिल्हा वाऱ्यावरबाराभाटी : गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात प्रख्यात आहे. म्हणूनच मत्स्य व्यवसायाला येथे मोठे उधान आलेले असते. परंतु अनेक ठिकाणच्या केंद्रावर कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार सुरू असून केंद्र वाऱ्यावर सोडून दिले आहे. या केंद्रावर अधिकारी नसल्याने मासेमार बांधवांची उपासमार होत आहे. त्यामुळए मत्स्य बीज केंद्र सुरु करा अशी मागणी संघमैत्री मस्त्यपालन संस्थेचे अध्यक्ष दिलवर रामटेके यांनी केली आहे.गोठणगाव मस्त्य बीज केंद्रावर बीज घेण्याकरीता गेले असता त्या ठिकाणी अधिकारी नसतात. तेथील कर्मचारी नेहमीच नशेत असतात अशा तक्रारी केल्या जात आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे या केंद्रावर अनेक समस्या पहायला मिळाल्या आहेत. शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी बीज पाहिजे तसे मिळत नाही व काळाबाजार करुन बीज विकले जाते, अशी तक्रार मत्स्य पालन संस्थेची आहेत.तालुक्यातील केंद्रावर बीज मिळाले असते तर कशाला कोलकाता छत्तीसगड येथून बिज आणावे लागले असते, अशा तक्रारीही संस्थांकडून केल्या जात आहेत. सदर केंद्रावर पाच कोटी मत्स्य बीज निर्मिती केली जात होती. परंतू आता या केंद्रावर कर्मचारी काळाबाजार करुन येथील बीज आणि मासोळी विकत असल्याचे दिसून आले. एवढ्यावरही मात्र या प्रकाराकडे अधिकाऱ्यांची नजर नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी मत्स्य विकास अधिकारी नाही. अशा अनेक समस्यांनी हे केंद्र ग्रासले आहे. तेव्हा मत्स्य विकास अधिकारी आणि येथील कर्मचारी यांच्यावर नियंत्रण असावे व केंद्र सुरळीत चालावे अशी मागणी दिलवर रामटेके, दामू डूमाने आणि अनेक मत्स्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)